रयत शिक्षण संस्थेचा १०२ वा वर्धापन दिन साजरा



 रयत शिक्षण संस्थेचा १०२ वा वर्धापन दिन साजरा 

सातारा(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचा १०२ वा वर्धापन दिन सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्सटीट्युट ऑफ सायन्स या महाविद्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोल्हापूर  विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.हेमंत कटरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  रयत शिक्षण संस्थेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की ,’’केवळ ३० रुपये व ४ विद्यार्थी घेऊन सुरु झालेल्या रयत शिक्षण संस्थेत आज साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.केजी पासून पीजी पर्यंत शिक्षण देत ग्रामीण भागात ज्ञानदान करणारी  ही संस्था केवळ शिक्षण देत नसून ती विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहे.विविध संस्थाशी सामंजस्य करार करून ती विद्यार्थ्याचे भवितव्य घडवीत आहे .ती विद्यार्थ्यांना रस्त्यावर सोडत नाही.हीच जाणीव ठेवून रयतचा कारभार होत राहिला तर रयतचे ग्रामीण विद्यापीठ पाहण्यासाठी परदेशी शिक्षण तज्ञ  इथे येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.महात्मा फुले,डॉ.आबेंडकर याचेसाठी जशी चरित्र लेखन साधनसमिती स्थापित करण्यात आली तशीच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने चरित्र लेखन समिती स्थापित करून त्यांच्या चरित्राचे खंड विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध व्हावेत यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन, असेही ते म्हणाले.

 अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला.रयत शिक्षण संस्थेच्या जोपासनेत  प्रबोधनकार ठाकरे यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.संस्थेच्या स्थापनेच्या वेळी झालेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात प्रबोधनकार ठाकरे होते.प्रबोधनकार आणि कर्मवीर यांचे जिव्हाळ्याचे संबध होते.कर्मवीरांनी अनेकदा शिवजयंतीला व्याख्यान देण्यासाठी त्यांना साताऱ्यात आणले होते.महात्मा गांधी यांची भेट घेऊन रयत शिक्षण संस्थेचे काम हे कर्मवीर भाऊराव पाटील कसे तळमळीने करतात हे त्यांनी गांधीजीना पटवून दिले होते .त्यामुळे हरिजन सेवक संघाच्या निधीतून दर वर्षाला पाचशे रुपये रयत शिक्षण संस्थेला मिळत होते असेही ते म्हणाले.

     रयत शिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासनाचे मोठे सहकार्य असल्याचे सांगून आज जागतिकीकरणाच्या काळात ज्या स्पर्धा निर्माण झाल्या आहेत ते लक्षात घेऊन रयत पुढच्या काळात स्वायत्त महाविद्यालये वाढवणार आहे .त्यासाठी शासनाने संस्थेला  सहकार्य करावे.  रयतच्या ४२ महाविद्यालयासाठी स्वतंत्र विद्यापीठ द्यावे. काळानुसार बदल  करायचे असतील तर खाजगी शिक्षण संस्थाशी आपली स्पर्धा वाढणार आहे.आम्हाला शासनाने संसाधने उपलब्ध करून दिली तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी रयत प्रयत्न करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

या समारंभाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत ज्यांनी महत्वाचे योगदान दिले अशा विविध कार्यकर्त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ठेवण्यात आलेल्या विविध पारितोषिकाची माहिती संस्थेचे ऑडीटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी दिली.एन.आय.आर.एफ मध्ये देशात पहिल्या १५० मध्ये स्थान मिळवणारे वाय.सी.,कॉलेज सातारा ,ए प्लस ग्रेड प्राप्त करणारे माढा कॉलेज, इनोव्हेशन ,स्टार्ट अप पेटंट इत्यादी मध्ये विशेष कार्य करणारे डी.पी.भोसले कोलेज कोरेगाव या तिन्ही महाविद्यालयाच्या शाखाप्रमुखांचा यावेळी सत्कार करण्यात आला.चौदा पेटंट मिळवणारे प्रा.डॉ.गुरुमित वधवा ,शिवाजी विद्यापीठात एम.ए संस्कृत मध्ये प्रथम आलेली महेश्वरी गोळे ,वायू सेनेच्या फ्लायिंग ऑफिसरपदी निवड झालेली कू.पूजा शिंदे,तहसीलदारपदी निवड झालेले श्र .अजितराव जंगम,रोझ प्रकल्पात उल्लेखनीय कार्य करणारे श्री .नितीन घोडके,एन.टी एस परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारी श्रुतिका मोहोळकर ,एन.एम.एम.एस परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारा,अनुज्ञ वराडे,शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारी कू.स्वरा टकले,व आर.टी.एस.परीक्षेत संस्थेत सर्वाधिक गुण मिळवणारी कू.अनुजा यादव यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

या समारंभाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी केले. आभार सहसचिव प्राचार्या डॉ.प्रतिभा गायकवाड यांनी मानले.सूत्र संचालन प्रा.डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले .या कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव मा .संजय  नागपुरे ,कौन्सिल सदस्य माधवराव मोहिते,अॅड.रविंद पवार,मा.प्रभाकर देशमुख, मा.दिलावर मुल्ला, प्राचार्य आर.डी.गायकवाड,तसेच रयत शिक्षण संस्थेचे आजी व माजी पदाधिकारी ,प्राचार्य ,प्राध्यापक ,शिक्षक व विद्यार्थी सोशल डीस्टन्सीग पाळून उपस्थित होते. या समारंभाचे ऑनलाईन प्रसारण करण्यात आले .

 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर