२७ सप्टेंबर २०२१ पासुन टपालनाका ते उरण नाका हा मार्ग एक दिशा मार्ग
२७ सप्टेंबर २०२१ पासुन टपालनाका ते उरण नाका हा मार्ग एक दिशा मार्ग
पनवेल : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पनवेल शहर वाहतुक शाखेच्या हद्दीतील पनवेल शहर व आजुबाजुच्या परिसराचा विकास झपाटयाने झालेला आहे. पनवेल परिसराच्या लोकसंख्येत व मोटार वाहनांच्या संख्येत देखील मोठी वाढ झालेली आहे. परिणामी पनवेल शहरातील रस्त्यांवर वाढ झालेल्या मोटार वाहनांचा व रहदारीचा ताण पडलेला आहे. वाहतुकीच्या निर्माण झालेल्या समस्येमुळे पनवेल शहरातील मुख्य रस्ते व त्यांना जोडणारे इतर रस्ते येथे वरचेवर वाहतुकीचा खोळंबा होउन नागरीकांना, मोटार चालकांना अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी शहरातील वाहतुक व्यवस्थेत सुसुत्रता आणणेसाठी शहरातील वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्यानुसार टपाल नाका ते उरण नाका हा मार्ग एक दिशा मार्ग राहील. व उरण नाक्याकडुन टपाल नाक्याकडे येणा-या सर्व वाहनांना ( दुचाकी वाहने वगळुन ) प्रवेश बंद करण्याबाबतची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्याचा टपाल नाका ते उरण नाका एकेरी मार्ग करण्यात आल्याने इतर मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दिनांक ०४ ऑक्टोबर २००३ अन्वये टपालनाका ते उरण नाका हा मार्ग एक दिशा मार्ग व उरण नाक्याकडुन टपाल नाक्याकडे येणा-या सर्व वाहनांना ( दुचाकी वाहने वगळुन ) प्रवेश बंद राहील. अशी अधिसुचना काढण्यात आली होती. त्यानुसार पनवेल शहरातील वाढत्या लोकसंख्येचा व मोटारवाहनांच्या संख्येत वाढ झालेली असल्याने पनवेल मधील वाहतुकीमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी पासुन पनवेल वाहतुक शाखेच्या हद्दीतील टपाल नाका ते उरण नाका हा मार्ग एक दिशा मार्ग राहील. व उरण नाक्याकडुन टपाल नाक्याकडे येणा-या सर्व वाहनांना (दुचाकी वाहने वगळुन) प्रवेश बंद करण्याबाबतची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच पंचरत्न चौक ते टपाल नाका (मोमीनपाडा मशीद मार्गे) या रस्त्यावर वाहनांची सम-विषम पार्कीगची देखील कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याची सर्व वाहन चालक व नागरीकांनी नोंद घ्यावी. पनवेल शहरात यापूर्वीदेखील एकेरी मार्ग करण्यात आले आहेत. मात्र त्याला वाहन चालक जुमानत नाहीत.
Comments
Post a Comment