पनवेल परिसरात खुलेआम मद्यपान, ढाब्यांवर होते मद्यविक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष, ढाब्यांवर ‘खाणे कम दारू जाम’, कारवाईची मागणी


 पनवेल परिसरात खुलेआम मद्यपानढाब्यांवर होते मद्यविक्रीराज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष, ढाब्यांवर खाणे कम दारू जाम’, कारवाईची मागणी 

पनवेल : ढाब्यांवर मद्यपान करण्यास मनाई असताना देखील पनवेल परिसरातील ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जात आहे. विशेष म्हणजे ढाबा चालकच मद्य पुरवठा करताना दिसत आहेत. तर काही ढाब्यांवर मद्य विक्री सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुले अशा पकारे बेकायदेशिर धंदे करनारया विरोधात कारवाई करण्याची मागणी के
ली जात आहे.

             पनवेल परिसरातील ढाब्यांवर मद्यपान करुन मद्यपी खुलेआम धिंगाणा घालत आहेत. परिसरातील सुकापूरनवीन पनवेलशिरढोणपळस्पेआदि ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढाबे आहेत. येथील ढाब्यांवर मद्यपान केले जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यपींची जत्रा भरते. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी गस्त घालावी व अशा हॉटेल व बारचालकांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. परिसरातील ढाब्यांवर सर्रास दारूविक्री देखील सुरू असल्याचे समोर आले आहे. पनवेल पेण हायवे रोडवर असलेल्या ढाब्यांवर अवैधरित्या विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्री होत असल्याचे समोर आले आहे. शिरढोणपळस्पेखारपाडासांगुर्लीकल्हेताराचिंचवणतूरमाळे येथे ढाबे संस्कृती रुळली आहे. येथील ढाब्यांवर तळीरामांना हवी तेव्हा दारू मिळत असल्याचे समोर आले आहे. मात्र ढाब्यांवर कारवाई करण्यास उत्पादन शुल्क विभाग उदासीन आहे.

             पोलिसांबरोबरच उत्पादन शुल्क खात्यावरबेकायदेशीर दारु उत्पादन व विक्री होऊ नयेत्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आहे. मात्र या उत्पादकांवर तसेच विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत हा विभाग देखील उदासीन असल्याचे दिसत आहे. परिसरातील सर्वच ढाब्यांवर बेकायदेशीर दारूविक्री होत असल्याचे चित्र आहे. ढाब्यांवर बेकायदेशीर दारूविक्रीने जोर धरला आहे. दारु विक्रीसाठी शासकीय परवाना आवश्यक असतो. मात्रढाब्यांवर विनापरवाना दारूविक्री होत आहे. या ढाब्यांना वेळेचे देखील बंधन नसते. काही बोटांवर मोजता येणारे ढाबे जेवणासाठी अधिकृत आहेत. बाकी हॉटेल-ढाब्यांवर सर्रास दारू मिळते. बर्‍याच ढाब्यांवर खाणे कम दारू जाम’ असे चित्र पाहण्यास मिळत आहे. या ढाब्यांवर एक वेळ जेवायला मिळणार नाही;पण दारू प्यायला मिळेल आणि हेच खरे उत्पन्नाचेनफ्याचे साधन म्हणून काही ढाबेचालकांनी ही पद्धत सुरू केली आहे. फक्त येथे मद्यपानास बंदी’ आहे’ एवढा बोर्ड मात्र लावलेला असतो. मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलिस यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहेत. अशा ढाब्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पनवेल परिसरात सुरू असलेल्या बेकायदशीर धंद्यांवर कारवाई केली नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा ईशारा पनवेल बार असोसिएशनने दिला आहे.

 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर