म्हसळा तालुक्यातील आडी बौद्धजन व रोहिदास उन्नती मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; वृक्षारोपण करून जपली सामाजिक बांधिलकी !


 


म्हसळा तालुक्यातील आडी बौद्धजन व रोहिदास उन्नती मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; वृक्षारोपण करून जपली सामाजिक बांधिलकी !

म्हसळा :दिनेश काप 

संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा संदेश "वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे वनचरे" हा संदेश प्रत्यक्षात अंमलात आणला तो आडी बौध्दजन आणी रोहिदास उन्नती मंडळ यांच्या उत्साही कार्यकर्ते आणी स्थानिक मंडळानी.तसे पाहता आडी हे गांव श्रीवर्धन आणी म्हसळा यांच्या सीमेवर,डोंगरदऱ्यात  आणी निसर्गाने मनसोक्त उधळण केलेले आणी सुप्रसिध्द सावित्री नदीच्या काठावर वसलेले म्हसळा तालुक्यातील आदर्श असे आडी गांव होय.या गावचे वैशिष्ट म्हणजे गावातील बौध्द समाज आणी रोहिदास समाज यांच्या प्रबोधन विचारसरणीतून गावांमध्ये बौध्द समाज आणी रोहिदास समाज यांचे सयुक्त मंडळ होय.या मंडळाच्या माध्यमातून गेल्या वर्षी म्हणजे ०३ जून २०२० रोजी जे निसर्ग नामक महाभयंकर चक्रीवादळ आले त्या मध्ये रायगड जिल्ह्याचे फार मोठी वीत्य हानी झाली,अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले,शेकडो झाडे मुळासकट उमलून जमीनदोस्त झाली.ही हानी कधीही भरून न येणारी आहे.परंतु आडी गावातील बंधूंनी हार मानली नाही अगदी मोठ्या जोमाने त्यानी चंग बधला की जरी निसर्ग चक्रीवादळाने शेकडो झाडे पाडली असली तरी या वर्षी त्याच्या पेक्षा जास्त झाडे पुन्हा लावू आणी जगवू,त्या प्रमाणे आडी बौध्दजन आणी रोहिदास उन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २० जून २०२१ रोजी स्थानिक ठिकाणी मुक्काम आडी,तालुका  म्हसळा,जिल्हा रायगड येथे वृक्ष रोपनाचा भव्य-दिव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणी आनंदी वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिति लाभली ती म्हणजे आडी गावचे विद्यमान सरपंच आयु.प्रकाश म्हसकर,माजी सरपंच आयु.मधुकर पवार,आडी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आयु.बापू तांबीटकर,आडी मधलीवाडी ग्रामस्थ मंडळाचे स्थानिक अध्यक्ष आयु.राजेन्द्र भोगल आणी गावातील ईतर मान्यवर,लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन सहभागी झाली होती.


हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सचिन खोपकर,मंडळाचे सरचिटणीस संतोष गमरे,उपाध्यक्ष -राजेश गमरे,उपाध्यक्ष,दिपक गमरे,अनिल गमरे,आदेश गमरे  , दिपक गमरे,गोविंद गमरे,मंडळाचे जेष्ठ सल्लागार संदेश गमरे,रवींद्र गमरे,आनंद गमरे यांच्या प्रमुख उपस्थित वृक्ष रोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला,प्रतिवर्षी असाच कार्यक्रम करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे."वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे वनचरे"हा पर्यावरणाचा समतोल राखून प्रत्येकाने एक तरी झाडे लावू सोबत झाडे लावा,झाडे जागवा हा संदेश देत एक चांगला पायंडा आडी बौध्दजन आणी रोहिदास उन्नती मंडळाने दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर