दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुलगी बेपत्ता ??
पोलीसांचा शोधकार्य चालूच......
सर्फराज दर्जी (बोर्ली पंचतन):
श्रीवर्धन तालुक्यात दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडवली गावातील , आफरीन हुसैन शिरगावकर, वय-२२ ही हरवलेची घटना समोर आली आहे.
या बद्दल दिघी सागरी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहतीनुसार, हनिफा हुसैन शिरगावकर(आई) व लहान मुलगी नसरीन शिरगावकर हे दोन्हीही मोठी मुलगी अमरीन हिला भेटण्यासाठी ३० मे २०२१ रोजी सकाळी चिपळूण येथे गेल्या असता, आफरिन हुसैन शिरगावकर वय-२२, उंची १५५सेमी.,चेहरा-उभट,शरिराने सडपातळ,रंगाने निमगोरा,हि अंगावर पंजाबी ड्रेस घालून दिनांक ३० मे २०२१ रोजी सकाळी ९वाजता च्या सुमारास ३० मे २०२१ रोजी आपल्या राहत्या वडवली येथील घरातून कोणाला न सांगता कुठे तरी निघून गेली.
हनीफा ही चिपळूण येथून सायंकाळी परत आल्यावर आपली मुलगी आफरीन उशिरापर्यंत घरी नाही परतल्याने तिचा नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेण्यात आला. मात्र, शोध घेऊन देखील आफरीन सापडली नाही. त्यामुळे तिची आई हनीफा हुसैन शिरगावकर हिने आपली मुलगी बेपत्ता असल्याचे कळताच दिघी पोलिस ठाण्यात दि.१जून२०२१ रोजी मिसिंग तक्रार दाखल केली,याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के.एम.शेख.यांनी म.मि.रजि.क्र. ०३/२०२१ मिसिंग तक्रार नोंदवून दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली, त्या हरवलेल्या मुलीचा शोध घेत आहेत.
Comments
Post a Comment