शिवसेनेच्या प्रयत्नामुळे कळंबोली व कामोठे येथील जोड रस्त्याच्या कामाला सुरूवात



 शिवसेनेच्या प्रयत्नामुळे कळंबोली व कामोठे येथील जोड रस्त्याच्या कामाला सुरूवात

पनवेल, दि.11 (संजय कदम) ः  कळंबोली येथून कामोठ्यात जाण्याकरिता मोठा वळसा घालून जावे लागत होते. यामुळे पादचार्‍यांसह वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. ही गोष्ट लक्षात येताच शिवसेनेच्या माध्यमातून याबाबत पाठपुरावा करून खा.श्रीरंग बारणे यांनी विशेष लक्ष घालून ही समस्या सोडविली आहे. व प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे.

कळंबोलीमधून  कामोठे येथे जाण्याकरिता  शिवसेना  शाखे वरून मोठा वळसा घालून जावे लागते त्यामुळे  कामोठे व  कळंबोलीतील रहिवाश्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच पेट्रोल व डिझेलचा सुद्धा मोठया प्रमाणात अपव्यय होत असून त्याचा नाहक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच सध्या तेथून विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार हे रस्ता क्रॉस करतात त्यामुळे त्या ठिकाणी छोटे-मोठे अपघात होतच असतात. तरी भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी लक्ष घालावे या करीता जिल्हा प्रमुख शिरीष घरत व महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या आदेशाने आणि पनवेल उप महानगर समन्वयन आत्माराम गावंड, कामोठे शहरप्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाने विभाग संघटक कळंबोली गिरीश धुमाळ, माजी शहरप्रमुख निलेश भगत, उपतालुका संघटक व महिला आघाडी सौ.टीया धुमाळ यांनी भेट घेऊन, तसेच चर्चा करून निवेदन सादर केले  सदर निवेदनाची त्वरीत दखल घेऊन बारणे यांनी संबंधित बांधकाम खात्याला लेखी पत्र देऊन कळंबोली व कामोठे येथील नागरिकांना होणारा त्रास,दुर करण्यासाठी जोड़ रास्ता चालू करून देण्यात यावा, अशी मागणी केली. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

फोटो ः खा.बारणे यांच्यासह इतर पदाधिकारी रस्त्याची पाहणी करताना.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर