पनवेल महापालिकेने लागू केलेला अवाजवी मालमत्ता करामध्ये नियमीतता व पारदर्शकता यावी ः महानगरप्रमुख रामदास शेवाळे



 पनवेल महापालिकेने लागू केलेला अवाजवी मालमत्ता करामध्ये नियमीतता व पारदर्शकता यावी ः महानगरप्रमुख रामदास शेवाळे

raigadmat.page

पनवेल / संजय कदम  : सध्या करोना संकटकाळ सूरु असताना संसर्गजन्य स्थिती असताना लोकांचे आधिच आर्थिक व मानसिक नूकसान झालेले आहे. पनवेल महापालिकेने लावलेल्या मालमत्ता कराचा भार हा लोकांना सहन होण्यासारखा नाही. मानवतेच्या दृष्टीने व सरकारची जबाबदारी समजून करात फार मोठी कपात करुन सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना पनवेल महानगर क्षेत्र महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे केली आहे. 

        पनवेल शहर महानगर पालिका क्षेत्रातील गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना आपल्या कार्यालयाकडून अवाजवी मालमत्ता कर लावण्यात आलेला आहे . सदहू कर हा सन आक्टोबर 2016 पासून आज रोजी पर्यंत लावण्यात आलेला आहे. सिडको महामंडळाने सुद्धा सेवा शुल्क व पाणी पट्टी तथा सिडको हस्तांतरण शुल्क आज रोजीपर्यंत घेत आहेत . एकाच क्षेत्रात सेवेकरीता दोन सरकारी प्राधिकरण कर संकलीत करत असल्या कारणाने सामान्य नागरिकांची लुट होत असल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध होत आहे . तरी आपण सदर मालमत्ता करात पारदर्शकता व नियमीतता आणावी . सिडको महामंडळ व आपण कर व शुल्क संकलनात याबाबत अधिक पारदर्शकता आणावी . पनवेल महापालिका क्षेत्रात एकच असल्या कारणाने आपण ग्रामीण व सिडकोचा शहरी भाग असे वेगवेगळे कर रचनेचे नियम नसावेत , एक पालिका एक कर याची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे . सिडको महामंडळ व महापालिका या नगरविकास खात्याच्या अंतर्गत असल्याने आपल्या समन्वयासाठी मेहेरबान मंत्री महोदयांसमोर या संदर्भात बैठक लावणार आहोत. या बैठकीनंतरच मालमत्ता कराची वसूली करावी तोपर्यंत मेहेरबान साहेब करवसूलीला स्थगिती द्यावी., अशी मागणी रामदास शेवाळे यांनी केली आहे. 


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर