मोफत वाचनालयाचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन
मोफत वाचनालयाचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते उदघाटन
पनवेल : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनी येथे रिक्षा युनियनच्या मागणीनुसार मोफत वाचनालयाचे उद्घघाटन विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेविका सारिका भगत, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, माजी नगरसेवक शिवाजी थोरवे, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, श्री अतुल भगत, श्री.अनिल बंडगर, शिवसेना शहर प्रमुख श्री सदानंद शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओंकार गावडे, किरण घरत, योगेश कोठेकर, श्री.डी.एन.यादव, अनंत म्हात्रे ,रिक्षा युनियनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, सौ भारती मोहिते, सौ नलिनी जाधव, सौ किशोरी पाटील, श्रीमती अश्विनी जोगदंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या मोफत वाचनालयाचा उपयोग येथील रहिवासी, नागरिकांना होणार आहे.
Comments
Post a Comment