२४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी



 २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी 


पनवेल(प्रतिनिधी) लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, यासाठी आता २४ जूनला सिडकोवर किमान ०१ लाख लोकांचा धडक आंदोलन होणार आहे.  त्या अनुषंगाने विभागनिहाय बैठका आणि त्यामध्ये नियोजन करत जोरदार तयारी सुरु आहे. 
          लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका होत आहे. त्या अनुषंगाने गव्हाण, पालीदेवद जिल्हा परिषद आणि पळस्पे, कोन पंचायत समिती विभाग निहाय बैठका संपन्न झाल्या. या बैठकीस भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते सुभाष जेठु पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, विविध ग्रामपंचायतींचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 
         १० जूनला झालेल्या भव्य आणि आदर्श अशा मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधण्याबरोबरच वाहवा मिळवली. 'निर्धार पक्का दिबासाहेबांचेच नाव पक्का' हि प्रामाणिक भूमिका घेत आंदोलनाचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. आता रस्त्यावर उतरून सिडकोला घेराव घालण्यासाठी २४ जून उजाडण्याची वाट पहात आहेत. 
चौकट - 
भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी २४ जूनला सिडकोला घेराव घालण्यात येणार आहे. ज्येष्ठ आणि तरुणाची फौज या आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडत असताना महिलाही मागे राहिल्या नाहीत. २४ जूनला योगायोगाने याच दिवशी वटपौर्णिमा आहे. असे असले तरी भूमिपुत्र सावित्रींनी यंदाची वटपौर्णिमा या आंदोलनात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. आणि या लढाईच्या अनुषंगाने आपल्या सौभाग्याला अधिक बळ देण्यासाठी सिडकोच्या दारातच वटपौर्णिमा साजरी करणार असून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचा नाव मिळेपर्यत या संघर्षात महिलांचाही सहभाग राहणार आहे.  आणि तशीही तयारी महिला मंडळाकडून जोरदार सुरु आहे. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर