आरोग्य सेवकाना कोविडयोद्धा सन्मानपत्र, मास्क, सॅनिटायझर देऊन सन्मानित, शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा उपक्रम
आरोग्य सेवकाना कोविडयोद्धा सन्मानपत्र, मास्क, सॅनिटायझर देऊन सन्मानित, शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा उपक्रम
पनवेल :शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १९ जून रोजी खांदा कॉलनी येथील रोटरी सेंटरमध्ये विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वॅक्सिंग सेंटर मधील आरोग्य सेवक आणि रोटरी मधील आरोग्य सेवक यांना शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत कोरोना काळात केलेल्या आरोग्य सेवेमुळे कोविडयोद्धा सन्मानपत्र, मास्क, सॅनिटायझर देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेविका सौ.सारिका भगत, माजी.उपनगराध्यक्ष गणेश पाटील, माजी नगरसेवक श्री शिवाजी थोरवे, श्री.अतुल भगत,श्री.अनिल बंडगर, श्री मंगेश अपराज, श्री.योगेश कोठेकर, श्री.डी.एन.यादव, अनंत म्हात्रे ,सौ.भारती मोहिते, सौ नलिनी जाधव, सौ किशोरी पाटील, श्रीमती अश्विनी जोगदंड व पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना काळात आरोग्य सेवकांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन कोरोना रुग्णांची सेवा केली. आरोग्य सेवकांनी केलेल्या आरोग्य सेवेची दखल घेऊन शेतकरी कामगार पक्ष आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या गौरवा बद्दल तेथील आरोग्य सेविकांनी समाधान व्यक्त केले. आजच्या झालेल्या या सन्मानामुळे यापुढेही आरोग्य सेवा करण्यास एक वेगळी ऊर्जा मिळते अशा भावन तेथील आरोग्य सेवकांनी बोलून दाखविल्या.
Comments
Post a Comment