वेद नाही वाचले तरी चालेल पण वेदना मात्र वाचता यायला हवी ! बाललैंगिक अत्याचार व पोक्सो कायदा .

 वेद नाही वाचले तरी चालेल पण वेदना मात्र वाचता यायला हवी ! बाललैंगिक अत्याचार व पोक्सो कायदा .

          4 जून हा दिवस International day of  Innocent  children victims of aggression म्हणजे आक्रमकतेला बळी पडलेल्या निष्पाप बालकांचा दिवस म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे  , या दिवसाचे औचित्य साधून  बालकांवर होणाऱ्या शोषणावर प्रकाश टाकून व अन्यायाला वाचा  फोडून जनजागृती घडवून आणण्याचा हा छोटासा प्रयत्न

 इतिहास :-
            1982 मध्ये झालेल्या जागतिक युद्धा मध्ये इस्रायलकडून मोठ्या प्रमाणावर लेबणान व पॅलेस्टाईन मधील बालकांवर अत्याचार करण्यात आले. या हिंसाचारामध्ये  असंख्य  निष्पाप लहान मुलांना  वेदना  झाल्या त्यांचे शोषण झाले . हे सर्व  आज इतिहासजमा झालेले असताना या मुलांना आपण  न्याय तर देऊ शकत  नाही पण आपल्या आजूबाजूला होणाऱ्या बालकांवरील अत्याचारा विरोधात  जनजागृती व सावधानता तर नक्कीच  निर्माण करू शकतो.
 बाललैंगिक शोषण म्हणजे काय (child sexual abuse ):-
                   बाललैंगिक शोषण हा मुद्दा अतिसंवेदनशील आहे , तो अतिगंभीर गुन्हा आहे प्रत्येक पालकांनी आपल्या बालकांप्रति जागरूक  असणे महत्वाचे. आज आपल्याला हा विचार करण्याची   गरज आहे की आपले मुल बाल हिंसाचाराचे शिकार तर होत नाही ना? आपले मूल शोषण सहन करून आपल्यापासून लपवून तर ठेवत नाही ना ?
             बाललैंगिक शोषणाच्या केसेस बघताना  हे लक्षात येतं की बरेच  पालक  या गोष्टी बद्दल जागरूक नसतात तसेच   बऱ्याच पालकांचा चुकीचा  समज असतो की बाललैंगिक हिंसाचार  हा फक्त समाजातील दीनदुबळ्या व गरीब  मुलांवरच  होऊ शकतो !  किंवा बाललैंगिक अत्याचार  हा सामान्य व्यक्तीकडून केला जात नाही तर तो एखाद्या गुन्हेगारांकडून किंवा अनोळखी इसमाकडून केला जातो , आणि इथेच आपण मोठी चूक करतो .
               कुंपणच तर शेत खात नाही ना ? म्हणजेच आपल्या विश्वासातील व्यक्तीच या प्रकारच्या अत्याचाराला कारणीभूत तर नाही ना ?  यावर पालकांनी विशेष लक्ष द्यावे .  आजवर झालेल्या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास केला असता या प्रकारचे गुन्हे  बरेच वेळा रक्ताचे नातेसंबंध , इतर नातेवाईक , मित्रपरिवार ओळखीच्या व्यक्ती , शेजारी ,  शाळेत किंवा क्लासेस मध्ये मुलांच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती यांच्यामार्फत होतो .खूप कमी प्रमाणात अनोळखी व्यक्तीचा या गोष्टीशी संबंध असतो . आपल्या आजूबाजूच्या  सगळ्याच व्यक्ती या मानसिकतेचा नसतात पण .........?    हा पण एक चूक किंवा एखादी पिडोफिलिक  व्यक्ती पण आपल्या मुलाचा घात करण्यास कारणीभूत ठरते .

 आत्याचारानंतर बालकांवर होणारे परिणाम :-
       
            बाललैंगिक शोषण मग ते कुठल्याही प्रकारचे  असो याचा परिणाम मुलांच्या मनावर व शरीरावर खोलवर होतो तो कधीही भरून निघत नाही .
०  बालकांच्या नाजूक अवयवांना दहा किंवा इजा होणे.
० बालकांमध्ये लैंगिक संक्रमित रोग (STD) ची लागण होणे
० बालकांच्या मनात भीती किंवा चिडचिड निर्माण होणे
० अँटीसोशल बिहेवियर म्हणजे समाजातील व्यक्तीबद्दल  भीती किंवा तिरस्कार निर्माण होणे .
० अपराधी भावना किंवा न्यूनगंड निर्माण होणे, एकटे राहायला घाबरणे, बाहेर न जाणे ,झोपेत दचकने, विचित्र स्वप्न पडणे , वारंवार झोपेतून जागे होणे ,बिछाना ओला करणे इत्यादी त्रास होऊ शकतो .
०  बहुतांश वेळा हा आघात इतका भयंकर असतो  की मुलाला  मानसिक आजार होऊन मृत्यू ओढवू शकतो.

 सावधानता व जागरूक असणे हाच खरा उपाय:-
        डॉक्टर म्हणून जेव्हा अशा बालकांशी माझा संबंध येतो तेव्हा मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते  आजही भारतामध्ये सामाजिक बंधन आहेत या बंधनामुळे पालक व मुलं यांच्यामध्ये बाल लैंगिक शिक्षणाचा अभाव आहे , पालक आपल्या मुलांशी मोकळेपणाने बोलण्याची तयारी दर्शवत नाहीत . मागील  काही वर्षांमध्ये मुलांना शाळेत  बालशोषण व प्रतिबंध यांचे  वारंवार धडे दिले जात असले तरीही या प्रकारच्या घटना घडल्या नंतर मुलं घाबरून जातात त्यामुळे ही मुले आपल्या पालकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत प्रसंगी पालकांपासून  आशा गोष्टी लपवून ठेवतात . त्यामुळे पालक व मुलं यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असणे गरजेचे आहे .असे प्रकार होऊ नये यासाठी  पालकांनी पुढील काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे.
०  आपल्या मुलांना शरीराच्या अवयवांची  नावे व ओळख करून द्या.
० शरीरातील काही अवयव हे खाजगी असतात ही अवयव आई वडील व गरज पडल्यास आई वडिलांच्या मदतीने डॉक्टर यांनाच  दाखवावेत याची जाणीव करून घ्या .
० मुलांच्या गुप्त अंगाला कोणीही स्पर्श करू शकत नाही त्याचप्रमाणे मुलांनी दुसऱ्यांच्या अवयवाला मुळीच स्पर्श करू नये  याचे ज्ञान मुलांना असणे गरजेचे आहे .
०  एखादी व्यक्ती वारंवार भीती  दाखवत असेल किंवा दूर जाण्याची  धमकी देत असेल  तर मुलांनी आई-वडिलांना वेळीच सांगावे .
०  कोणत्याही परिस्थितीत मुलांनी शारीरिक आवायवाबद्दल चे रहस्य आई-वडिलांपासून लपवून ठेवू नयेत .
० मुलांनी त्यांच्या शारीरिक व संवेदनशील भागांची छायाचित्रे कोणालाही काढण्याची परवानगी देऊ नये असे होत असेल तर वेळीच पालकांना सांगावे
० एखादी भयानक किंवा अस्वस्थ करणारी परिस्थिती जर मुलांच्या आयुष्यात निर्माण झाली तर  त्यातून बाहेर कसे पडावे याचे ज्ञान मुलांना द्यावे
० मुलगा व मुलगी या दोघांनाही सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाची ओळख करून द्यावी .
० आई-वडिलांनी वारंवार वेळ काढून मुलांशी संवाद साधणे खूप गरजेचे आहे
० दुर्दैवाने आपल्या मुलांचे शोषण होत आहे  याची माहिती पालकांना झाल्यानंतर हा अन्याय सहन न करता कायदा व वैद्यकीय सल्ल्याचा आधार घेऊन गुन्हेगाराला उघड करावे .
०   मोबाईलचा  वाढता वापर व  डिजिटल युग हा शोषणाचा दुवा ठरू शकतो त्यामुळे मुलांच्या मोबाइल वापरावर लक्ष द्यावे .
० वयात आलेल्या मुलांच्या शरीरामध्ये निरनिराळे बदल होत असतात त्यामुळे त्यांच्याशी बोलताना मैत्रीपूर्ण संबंधाने व मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे .
 बाललैंगिक शोषण  व पोक्सो कायदा :-
                    पॉक्सो (POCSO) म्हणजेच  (The Protection of Children from Sexual Offences)   हा कायदा बाल लैंगिक शोषण विरोधात तयार केलेला अतिमहत्त्वाचा कायदा आहे 2012मध्ये पॉक्सो हा कायदा भारतीय न्याय दंडप्रणाली मध्ये लागू करण्यात आला.  या कायद्याची विशेष तरतूद म्हणजे 2012 पूर्वी पुरुष बालकावर होणाऱ्या लैंगिक हिंसाचारा विरोधात  कायद्यांमध्ये काहीही तरतूद नव्हती . परंतु पोक्सो कायदा आल्यानंतर पुरुष  मुलांच्या हक्कांना प्रचंड बळकटी प्राप्त झाली आहे या कायद्याची काही वैशिष्ट्ये वाखाणण्याजोगी आहेत .
 ० हिंसाचाराला बळी पडलेल्या बालकाच्या निवासस्थानावर किंवा त्यांच्या आवडीच्या ठिकाणी  जाऊन पोलीस अधिकारी त्यांचे निवेदन नोंदवतात .
०महिला पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणे ,  चौकशी दरम्यान पोलीस गणवेश व्यतिरिक्त कपडे परिधान करून गुन्हा नोंदविला जातो  त्यामुळे मुलांना पोलीस चौकशी झाल्याचे समजत नाही .
० मुलांची ओळख गुप्त ठेवली जाते
०  मुलांना चौकशीसाठी  पोलीस चौकीत पाचारण केले जात नाही .
० स्त्री बालकावर अत्याचार झाल्यास पालकांच्या उपस्थितीत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मुलीची वैद्यकीय तपासणी केली जाते.
० बाललैंगिक अत्याचाराच्या केस चा  निकाल इतर हा इतर  गुन्ह्यांच्या तुलनेत जलद गतीने लावण्याचा प्रयत्न केला जातो.
० अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा छडा लवकर लावण्यासाठी सरकारने काही विशिष्ट कोर्टाची  निर्मिती केली आहे.
० या कोर्टामध्ये बालकांच्या मानसिकतेचा पुरेपुर विचार केला जातो मुल घाबरून जाऊ नये त्याचे हसू होऊ नये किंवा अपमान होऊ नये म्हणून केस चालू असताना त्या केसशी संबंधित असणाऱ्या लोकांव्यतिरिक्त कोणालाही कोर्टात प्रवेश दिला जात नाही .
० पोक्सो हा कायदा फक्त शारीरिक अत्याचाराची निगडित नसून इंटरनेट किंवा मोबाईल द्वारे झालेल्या गुन्ह्यांच्या नोंदी ठेवणे व त्याच्यावर ॲक्शन घेणे ही ह्या कायद्याचा एक भाग आहे.
० बाललैंगिक  हिंसा हा कायद्यानुसार अजामीनपात्र गुन्हा आहे गुन्हेगारांना कठोर शिक्षा व कारावासाची तरतूद यामध्ये आहे .
      मोबाईलचा वाढता वापर, समाजात असणाऱ्या अफवा, समज , गैरसमज व मुलांचा आई-वडिलांचा सुसंवाद नसणे यामुळे चाईल्ड् सेक्स अब्युज चे प्रमाण वाढत आहे अन्याय सहन न करता ठाम पावले उचलून कायद्याच्या साहाय्याने तुम्ही एक पालक म्हणून आपल्या मुलांना न्याय देणे खूप गरजेचे आहे .
  जागरुकता !         सुरक्षा !             खबरदारी!                   न्यायव्यवस्था!
                                                                                  डॉ.  अंजली बाळकृष्ण लामतुरे
                                                            एम डी (होमिओपॅथी)
                                                                                             मुंबई
                                                            मो .   9890668770

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर