पंडितशेठ पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीवर्धन आराठी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील डांबरीकरणं झाले पूर्ण.भविष्यात तालुक्यात राजकीय भुकंपाची नांदी
पंडितशेठ पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीवर्धन आराठी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील डांबरीकरणं झाले पूर्ण.भविष्यात तालुक्यात राजकीय भुकंपाची नांदी
श्रीवर्धन तालुक्यातील आराठी गावातील अनेक ग्रामस्थांनी माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात एप्रिल २०२१ ला प्रवेश केला होता. आराठी येथील अनेक नागरी प्रश्न बर्याच कालावधीपासून प्रलंबीत असून सुद्वा सत्ताधारी नेतृत्वाने सदर प्रश्न सोडविण्यात फारसे गांभीर्य न दाखवता दूर्लक्ष केल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. सदर समस्या केवळ शेतकरी कामगार पक्ष दूर करू शकतो हे आराठी येथे केलेल्या शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या विकास कामावरून दिसत असल्याने तसेच शेतकरी कामगार पक्ष हा गोरगरिबांना न्याय आणी सन्मानजनक वागणूक देणारा पक्ष असल्याने सदर पक्षाकडून आराठी ग्रामपंचायत हद्दीतील रखडलेली विकासकामे होतील हा विश्वास ग्रामस्थांचा आज पूर्ण झाले. ग्रामपंचायत मध्ये निवडूण गेलेले लोकप्रतिनिधी हे केवळ मत मागण्यापूरतेच कामाचे निघाले... ग्रामपंचायत मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा एक ही सदस्य नसताना देखील येथील स्थानीक कार्यकर्ते मा. विवेक पोटफोडे तसेच तालुका चिटणीस मा.नगरसेवक वसंतशेठ यादव सातत्याने विकासकामांना मंजुरी मिळविण्यासाठी कायम झटत असतात. याचेच उदाहरण म्हणजे २०१४ पासून रखडलेल्या सदर रस्ताचे डांबरीकरण,सत्ताधारी पक्षाने भुमिपुजन केले मात्र रस्त्याचे काम मात्र केले नाही ,आज काम होईल ,उद्या होइल या आशेवर अनेक वर्षे गेली मात्र रस्त्याचे काम काही झाले नाही.सत्ताधार्यांच्या घडाळ्याचे काटे पुढे सरकत होते मात्र रस्त्याचा विकास मात्र बंद पडला होता. मात्र ज्यावेळेस आराठी ग्रामस्थांनी मा.वसतशेठ यादव व श्री विवेक पोटफोडे यांच्यासह माजी आमदार पंडीतशेठ पाटीलयांची भेट घेतली त्यावेळेस त्यांनी आराठी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या त्याचा बरोबर रस्त्याच्या दुरावस्थेची स्वःता पाहणी करुन सदर रस्ता लवकरात लवकर करुन देण्याचे आश्वासन दिले,आणि ते रस्ताचे काम करून पूर्ण देखील केले, मा.पंडीत शेठ पाटिल यांच्या धडाकेबाज काम करण्याच्या शैलीने शेतकरी कामगार पक्षाकडून श्रीवर्धनच्या रखडलेल्या विकासकामे पूर्ण होत असल्याचे सध्या तालुक्यात चित्र निर्माण झाले आहे. आराठी ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांकडून शेतकरी कामगार पक्षाचे तसेच आभार व्यक्त होत आहे.शेतकरी कामगार पक्ष जो शब्द देतो तो शब्द पाळतो हे या निमित्ताने स्पष्ट झाल्याचे मत तालुका चिटणीस मा.वसंतशेठ यादव यांनी व्यक्त केल आहे
Comments
Post a Comment