माथेरान टीमने घेतले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशिर्वाद

 माथेरान टीमने घेतले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशिर्वाद 




पनवेल(प्रतिनिधी) शिवसेनेतून भाजपात प्रवेश करून सेनेला जोरदार धक्का देणाऱ्या माथेरानच्या टीमने आज (दि. ०२ जून) लोकनेते रामशेठ ठाकूर यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट व आशिर्वाद घेतले. 
          माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रुपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव या १० नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे १४ पैकी १० नगरसेवकांनी केलेल्या या प्रवेशामुळे शिवसेना मोठा झटका बसला आणि त्या अनुषंगाने हा राज्यात चर्चेचा विषय बनला. भाजपात प्रवेश केलेले उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक आणि भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष मंगेश म्हस्कर, युवा नेते किरण ठाकरे, ज्येष्ठ नेते प्रविण सकपाळ, प्रदिप घावरे, कुलदिप जाधव, किरण चौधरी, राजेश चौधरी, सचिन दाभेकर, लक्ष्मी चौधरी, गिता जाधव, पुनम सकपाळ, भरती चौधरी, शितल चौधरी आदी माथेरानच्या टीमने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबरच आजच्या या शुभदिनापासून आम्ही अधिक जोमाने काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख उपस्थित होते. 

कोट- 
माथेरानच्या टीमने आज भेट घेऊन मला शुभेच्छा दिल्या. माथेरानच्या टीमने जास्तीत जास्त विकासगंगा आणावी यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. - लोकनेते रामशेठ ठाकूर  

कोट- 
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेत असताना त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या आशिर्वादातून आम्हाला विधायक कामे करण्याची ऊर्जा मिळाली आहे. त्यांच्या आशीर्वादाने अधिक जोमाने काम करू. - आकाश चौधरी, उपनगराध्यक्ष 
 
कोट- 
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व आणि कर्तृत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यांच्या कार्याची महती दूरवर आहे. आम्ही भाजपात प्रवेश केल्यानंतर आजच्या शुभदिनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आशिर्वाद घेऊन अधिक जोमाने कामाला आजपासून सुरुवात करीत आहोत.                                 - प्रदीप घावरे, ज्येष्ठ नेते 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर