नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीला स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचा पाठींबा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे या मागणीला स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचा पाठींबा
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः आगामी काळात होवू घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नावाला पाठींबा दिलेला आहे. दि.बा.पाटील यांनी सिडको प्रकल्पग्रस्त शेतकर्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. दि.बा.पाटील हे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्याच अथक प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना सिडकोकडून साडेबारा टक्के विकसित जमीन मिळाली. दि.बा.पाटील यांच्या संघर्षामुळे सिडकोमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकर्यांना तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मजूर सहकारी संस्था व स्थानिक प्रकल्पग्रस्त युवकांना सिडकोच्या कामांचे टेंडर मिळाले. त्याचप्रमाणे सिडकोने संपादीत केलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या प्रकल्पांमध्ये नोकर्या मिळाल्या.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भूमीपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी वेचले त्यासाठी आंदोलने केली व आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. त्यांच्यामुळे आज आम्ही भूमीपुत्र ताठ मानेने जगत आहोत. तरी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांच्या नावाला स्वाभिमानी युथ रिपब्लिन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांच्या सुचनेनुसार रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने पाठींबा जाहीर केला आहे.
फोटो ः महेश साळुंखे
Comments
Post a Comment