७ तारखेपासून तुमचा जिल्हा होणार का अनलॉक? सविस्तर वाचा ....
महाराष्ट्र अनलॉक
मुंबई : राज्यातील स्तरनिहाय अनलॉक बाबतचा आदेश अखेर जारी करण्यात आला असून ५ टप्प्यांमध्ये जिल्हे अनलॉक होणार आहेत. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे तुमचा जिल्हा अनलॉक होणार का हे आताच पाहून घ्या.
५ टक्के पॉझिटिव्हिटी दर व २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. तर या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच सोमवारपासून होईल, असे नमूद करण्यात आले आहे.
असे आहेत पाच स्तर:
पहिला स्तर : करोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे.
पहिल्या स्तरातील जिल्हे - अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा
दुसरा स्तर : पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत असे जिल्हे.
दुसऱ्या स्तरातील जिल्हे - औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी,
तिसरा स्तर : पॉझिटिव्हिटी दर ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापले आहेत असे जिल्हे.
तिसऱ्या स्तरातील जिल्हे - अकोला, अमरावती, बीड, पुणे, वाशिम, यवतमाळ
चौथा स्तर : पॉझिटिव्हिटी दर १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे.
चौथ्या स्तरातील जिल्हे - रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग,
पाचवा स्तर : पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापले आहेत असे जिल्हे.
पाचव्या स्तरातील जिल्हे - कोल्हापूर
Comments
Post a Comment