शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेना लावणार 61 हजार झाडे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी सुरवात •




 शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेना लावणार 61 हजार झाडे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी सुरवात 

उद्धव ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसा पर्यंत उद्दिष्ठ करणार पूर्ण 

पनवेल   (वार्ताहर)- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड याच्या वतीने पोलिस मुख्यालय रोडपाली येथे वृक्षारोपण करण्यात आले. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त 61 हजार झाडे लावण्याचा संकल्प महाराष्ट्र वाहतुक सेनेने सोडला आहे. 

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसी वृक्षरोपण करण्यास सुरूवात करण्यात आली असून  27 जुलैला माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा 61 वा वाढदिवस आहे. या दरम्यान  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये 61 हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे या लागवडी बरोबर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी प्रत्येकावर सोपविण्यात आली आहे. 

  महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून निसर्गामध्ये भरपूर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या 61 हजार वृक्षांच्या रोपांची लागण करण्याचा निर्धार अध्यक्ष उदय दळवी यांच्या संकल्पनेतून करण्यात आला आहे. त्या अनुषंगान 13 जून पासून कळंबोली येथील रोडपाली  पोलिस आयुक्तांलयाच्या आवारात वृषारोपन करून सुरवात करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे यावेळी आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान असलेल्या  कडुनिंबाच्या झाडाची लागवड करण्यात आली.

या वृक्षारोपणाच्या वेळी फक्त झाडे लावून उपयोग नाही तर ती जगवली पाहिजेत. एकदा वृक्षारोपण केल्यानंतर त्याचे संगोपन केले पाहिजे. याच पद्धतीने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचे मत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे रायगडचे उपाध्यक्ष बापूराव ढेंबरे यांनी व्यक्त केले.  निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे. वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र वाहतूक सेनेने हाती घेतलेल्या या वृक्षारोपण मोहिमेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या सह अनेक मान्यवरांनी स्वागत केले आहे. या वेळी  शिवसेना रायगड जिल्हा अध्यक्ष शिरीष घरत, शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे, महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष महेश गुरव, उपाध्यक्ष बापू ढेंबरे, चिटणीस विलास कामोटकर व पनवेल तालुका अध्यक्ष तुकाराम सरक, तुषार निढळकर, सागर चौधरी, किरण ढवळे, डी.एन. मिश्रा,नारायण फडतरे सचिव रायगड जिल्हा म.वा.से.पुष्कराज मुंगाजी, नामदेव घुले, संतोष गोवारी,राजू सोनवणे, शफिक शेख .

प्रशांत जाधव  यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले 


ऐतिहासिक जागी विद्यार्थ्यांसोबत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा झाला साजरा वाढदिवस 

पनवेल (वार्ताहर)-  पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रायगड मधील खालापूर तालुक्यातील "चावणी" ह्या वाडीवर शालेय विद्यार्थ्यांसोबत केक कापून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रीय सहसचिव रुपेश पाटील यांनी ह्याबाबत माहिती देताना म्हटले की ज्या शाळेत हा कार्यक्रम साजरा झाला त्या गावची ग्रामपंचायत गेल्या २५ वर्षपेक्षा जास्त काळ शिवसेनेच्या सोबत आहे अशावेळी तेथील मुलाना जणू आदित्य ठाकरेआपल्याला भेटायला आले आहेत आणि त्यांच्या सोबत आपण केक कापून वाढदिवस साजरा करतोय ही भावना यावी म्हणून ही शाळा निवडली कार्यक्रमासोबत मुलांना मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य, खाऊ, फळे, खेळणी व मास्क चे वाटप सुद्धा ह्यावेळी करण्यात आले. सोबत मुलांना पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. आयोजन युवासेनेचे मावळ चे विस्तारक राजेश पळसकर, अनिकेत घुले व पदाधिकारी यांच्या माध्यमातून झाले. ह्यावेळी युवासेना मावळ, युवासेना रायगड, शिवसेना अवजड वाहतूक सेना रायगड व स्थानिक शिवसेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.Photo : आदित्य ठाकरे यांचा वाढदिवससामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करताना युवा सेना पदाधिकारी



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर