19 लाख रुपये किमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जफ्त, अन्न-औषध प्रशासनाची कारवाई



 19 लाख रुपये किमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जफ्त, अन्न-औषध प्रशासनाची कारवाई  

पनवेल  (वार्ताहर)-अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सोमवारी उलवे सेक्टर-10 मधील शिवाजी नगर गावठाणातील दोन घरांवर छापा मारुन महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला तब्बल 19 लाख 11 हजार रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा बाळगणाऱया एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. 

        उलवे सेक्टर-10 मधील शिवाजी नगर गावठाणातील दोन घरांमध्ये मोठ्या  प्रमाणात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन रायगड विभागाचे सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार, तसेच दक्षता व गुफ्त वार्ता मुख्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी विशे, महाले, घोसलवाड, महिला अधिकारी येवले, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी सचिन आढाव व त्यांच्या पथकाने उलवे शिवाजी नगर मधील संशयीत असलेल्या दोन्ही घरांवर छापा मारला. यावेळी दोन्ही घरांना टाळे असल्याचे आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सदर घरांचे टाळे तोडून दोन्ही घरांची तपासणी केली. या तपासणीत दोन्ही घरांमध्ये सुगंधित तंबाखुच्या 9 लाख 73 हजार रुपये किंमतीच्या 8 मोठÎा पिशव्या, रजनीगंधा पान मसाल्याचे 1 लाख 43 हजार रुपये किंमतीचे 74 बॉक्स, संजोग पान मसाल्याचे 2 लाख 82 हजार रुपये किंमतीच्या 47 गोण्या, राजनिवास सुगंधित पानमसाल्याचे 1 लाख 62 हजार रुपये किंमतीच्या 27 पिशव्या, विमल पान मसाल्याचे 3 लाख 16 हजार रुपये किंमतीच्या 32 पिशव्या, 17 हजार रुपये किंमतीचा एस-4 जर्दाच्या 10 पिशव्या, त्याचप्रमाणे 16 हजार 500 रुपये किंमतीचा एक्स एल-01 जाफरानी जर्दाच्या 11 पिशव्या असा एकुण 19 लाख 11 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा करुन ठेवण्यात आल्याचे आढळुन आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा करुन ठेवण्याबाबत आकाश चौरसिया याच्याकडे विचारणा केली असता, तो व राजु स्वामी हे दोघे गुटखा, पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थाच्या पीचा व्यवसाय करत असल्याचे तसेच त्यांनी त्यासाठी दोन्ही घर भाडÎाने घेतल्याचे सांगितले. दरम्यान, सुगंधीत तंबाखू, सुगंधीत सुपारी, गुटखा, पानमसाला या सारख्या पदार्थाचे उत्पादन, साठा, वितरण, विक्री व वाहतुक करण्यावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. असे असताना, आकाश चौरसिया व राजु स्वामी यांनी गुटखा, पानमसाला व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा करुन ठेवल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने या दोघांविरोधात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी साठा करुन ठेवण्यात आलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जफ्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर