जिल्हाधिकारी यांनी काढले नवीन आदेश. आता अत्यावश्यक सेवेतील दुकानें पूर्ण वेळ उघडी ठेवण्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी.
जिल्हाधिकारी यांनी काढले नवीन आदेश.
आता अत्यावश्यक सेवेतील दुकानें पूर्ण वेळ उघडी ठेवण्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी.
रायगड जिल्ह्यात पूर्ण दिवस उघडे राहणार अत्यावश्यक सेवेतील दुकानें.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह अन्य काही दुकाने आता पूर्ण वेळ सुरु ठेवण्याची परवानगी रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
रायगड जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे एक पत्रक आज (19 मे) जारी केले आहे. त्यानुसार किराणा, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, चिकन, मटण, मासळी विक्रेते, रेशन दुकानदार, फे्रब्रिकेशनची कामे करणारी आस्थापने, शेतीची अवजारे व या संबंधित दुकाने, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे आदी.
तसेच सिमेंट पत्रे, ताडपत्री, विद्युत उपकरणे तसेच हार्डवेअरची दुकाने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. सध्या ही दुकाने सकाळी अकरा नंतर बंद करण्यात येत होती . मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या दिनांक 19/5/2021 रोजी काढलेल्या नवीन आदेशानुसार आता ही दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवता येणार आहेत.वरील सर्व दुकानें दिवसभर आता उघडी राहणार असल्याने रायगड जिल्ह्यातील नागरिकांना यामुळे फार मोठा दिलासा मिळणार आहे.
Comments
Post a Comment