डॉ.मुनीर तांबोळी यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO) ने घेतली दखल*
*डॉ.मुनीर तांबोळी यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO) ने घेतली दखल*
*करंजाडे वसाहतीतील फेरीवाल्यांना पर्यायी जागा देण्यासंदर्भात केली होती मागणी*
प्रतिनिधी : दक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांनी करंजाडे वसाहतीतील फेरीवाल्यांना पर्यायी जागा सिडकोने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना दिले होते. पत्राची दखल मुख्यमंत्री सचिवालय कक्ष(CMO)ने घेत सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवत सदर प्रकरणी आपल्या स्तरावरून शासनाच्या प्रचलित कायदे,नियम,धोरणा नुसार उचित तत्काळ कार्यवाही करावी व अर्जदार यांना परस्पर कळविण्यात यावे, तसेच त्याची एक प्रत विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण भवन,नवी मुंबई यांना पाठविण्यात यावी असे पत्र मकरंद देशमुख उपायुक्त (महसूल) तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण भवन यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना पाठवले असल्याचे डॉ.मुनीर तांबोळी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
सामान्य नागरिकांसाठी सिडको कधीच विकासाचे पाऊल टाकताना दिसत नाही. करंजाडे वसाहती मध्ये रस्त्यावर बसणार्या फेरीवाल्यांवर सिडकोकडून वारंवार कारवाई करण्यात येत आहे. मात्र हातावर पोट असणार्या गरिबांच्या पोटावरच सिडको एकप्रकारे घाव घालीत असून सिडकोने करंजाडे वसाहतीतील फेरीवाल्यांना पर्यायी जागा देत पुनर्वसन करावे अशी मागणी दक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांनी मुखमंत्री, यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. पत्राची दखल घेण्यात आल्याने यावर लवकरच सिडको कडून मार्ग काढण्यात येईल व त्यामुळे करंजाडे वसाहतीमध्ये असणाऱ्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण होऊन फेरीवाल्याना पर्यायी जागा देत त्यांचे पुनर्वसन कायम स्वरूपी करण्यासाठी सिडकोकडून मोकळा भूखंड मिळेल अशी अपेक्षा डॉ.मुनीर तांबोळी यांनी व्यक्त केली. पर्यायी जागा मिळत नाही तो पर्यंत पाठपुरावा करत राहणार असल्याचे डॉ.मुनीर तांबोळी यांनी सांगितले.
Comments
Post a Comment