एस टी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता द्या . कास्ट्राईब संघटनेची मागणी .
एस टी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता द्या . कास्ट्राईब संघटनेची मागणी .
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे . गेल्या वर्षी देशात लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर रा.प. महामंडळाने अत्यावश्यक सेवा, मजूर , विदयाथ्यांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी सेवा दिली आहे . तसेच रा.प.चे उत्पन्न वाढीसाठी मालवाहतूक सेवा सुरु करण्यात आली आहे
. शिवाय मुंबई मध्ये बेस्ट उपक्रमासाठी देखील चालक / वाहकांसहीत रा.प. बसेस पुरविण्यात आल्या . गेल्या वर्षभरात मोठया संख्येने रा.प. कर्मचारी, अधिकारी कोरोना बाधीत झाले असून त्यातील शेकडो कर्मचा - यांचा मृत्यू झाला आहे. रा.प. अधिकारी, कर्मचारी हे जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. अशा स्थितीत पुन्हा एकदा शासनाने लॉकडाऊन जाहिर केल्यामुळे रा.प. महामंडळातील अधिकारी, कर्मचा - यांच्या जिवीताची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वरिल वस्तुस्थितीच्या अनुषंगाने खालील मागण्या आपल्यासमोर मांडत आहोत. कृपया सहानुभूतीपूर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा , ही विनंती . १. रु .५० लाखांचा विमा संरक्षण माहे जानेवारी २०२१ पासून पुढे सुरु ठेवावे व त्याचा लाभ सर्व कोरोना बाधीत अधिकारी , कर्मचारी यांना देण्याबाबत निर्णय घ्यावा .
२. प्रोत्साहन भत्ता रु .३०० / - हा देखील माहे जानेवारी २०२१ पासून पुढे सुरु ठेवावा व तो सरसकट सर्व अधिकारी , कर्मचारी यांना देण्याबाबत निर्णय घ्यावा .
३. कोरोना बाधीत अधिकारी ,कर्मचारी यांना आजाराच्या कालावधीची ' विशेष रजा मंजूर करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा . तसेच त्यांच्या रुग्णालयातील खर्चाची प्रतिपूर्ती मार्च २०२० पासून देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा .
४. मालवाहतूकीची कामगिरी करणा - या चालकांना एक सहकारी ( चालक अथवा सहाय्यक ) देण्यात यावा . तसेच त्यांची कामगिरी जास्त दिवसांची असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना देखील विशेष भत्ता देण्यात यावा . अश्या आशयाचे पत्र उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस टी महामंडळ यांना सरचिटणीस श्री सुनील निरभवणे यांनी देऊन एस टी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत मागणी कडे लक्ष वेधले आहे ..
Comments
Post a Comment