"ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह येथे पुन्हा सुरू केलेल्या फीवर क्लिनिक चा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा :-प्रितम जनार्दन म्हात्रे"
"ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह येथे पुन्हा सुरू केलेल्या फीवर क्लिनिक चा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा :-प्रितम जनार्दन म्हात्रे"
पनवेल : सध्या पनवेल मधील कोरोना पेशंटची वाढती संख्या पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अशा परिस्थितीत थोडेफार तरी लक्षणे दिसल्यास नागरिक मोठ्या प्रमाणात पनवेल महानगरपालिकेच्या फिवर क्लिनिक मध्ये येत होते. अशा परिस्थितीत काही दिवसापूर्वी ज्येष्ठ नागरिक हॉल येथे खाली मोहल्ला ,साई नगर, ठाणा नाका या विभागातील लोकांसाठी सुरूअसलेले फीवर ओपीडी केंद्र महानगरपालिकेने बंद करून कोळीवाडा येथे स्थलांतरित केले होते. त्यामुळे वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथील फिवर ओपीडी केंद्र येथे भरपूर गर्दी होत होती. सदरची आरोग्यविषयक महत्वाची बाब लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेत पाठपुरावा करून नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सदर फीवर ओपीडी केंद्र २ पुन्हा त्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ हॉल येथे सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला आणि महानगरपालिकेने ते केंद्र पुन्हा सुरू केले.
सदर सुरू केलेल्या केंद्रामध्ये माहिती घेण्यासाठी शेकाप नगरसेविका डॉ. सौ सुरेखा मोहोकर, सौ सारीका भगत, सौ प्रज्योती म्हात्रे, शेकापचे युवा नेते श्री.अतुल भगत, श्री मंगेश अपराज यांनी भेट दिली. त्याप्रसंगी तेथे आवश्यक असलेल्या वस्तूंचा विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह येथे पुन्हा सुरू केलेल्या फीवर क्लिनिकचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी केले आहे.
Comments
Post a Comment