गरीब, आदिवासी महिलांना सरकारी दवाखान्यात प्रसूतीची परवानगी देण्यात यावी - प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षनेते
गरीब, आदिवासी महिलांना सरकारी दवाखान्यात प्रसूतीची परवानगी देण्यात यावी - प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षनेते
नवीन पनवेल : कोविडच्या धर्तीवर पनवेल उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर महिलांच्या प्रसूतीचे काम बंद आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील, आदिवासी भागातील गरीब महिलांची गैरसोय होत आहे. प्रसूतीसाठी खाजगी दवाखान्यात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली असून भरमसाठ पैशाची गरज भासत आहे. त्यामुळे गरीब, आदिवासी महिलांची होणारी होरपळ थांबवण्यासाठी सरकारी दवाखान्यात प्रसूतीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. या कोरोनात कित्येकांचा मृत्यु झालेला आहे. तर कित्येक जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाच्या या संकटामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढवलेले आहे. या कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये खेड्यापाड्यातील आणि आदिवासी भागातील गोरगरीब महिलांना प्रसूतीसाठी खासगी दवाखान्यात जाण्याची वेळ आली आहे. खाजगी दवाखान्यातील प्रसुतीचे रेट्स जास्त असल्याने गरीब महिलांना येथे उपचार घेणे शक्य होत नाही. हे रेट्स गोरगरीब महिलाना परवडनारे नाहीत. त्यामुळे गरीब व आदिवासी महिलांची होणारी होरपळ थांबवण्यासाठी सरकारी दवाखान्यात प्रसूतीची परवानगी देण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना ई-मेलद्वारे निवेदन दिले आहे.
खेड्यापाड्यातील आणि आदिवासी भागातील महिलांच्या प्रसूतीसाठी सरकारी दवाखान्यात प्रसूतीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आरोग्य मंत्री, पालकमंत्री, महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे - प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका
Comments
Post a Comment