नागरी प्राथमिक केंद्र २ ज्येष्ठ नागरिक हॉल येथे आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यानी केली पाहणी

नागरी प्राथमिक केंद्र २ ज्येष्ठ नागरिक हॉल येथे आवश्यक सुविधा पुरविण्या

ची मागणी
, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यानी केली पाहणी
पनवेल : ज्येष्ठ नागरिक सभागृह येथील कोळीवाडा येथे स्थलांतरित झालेले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 अंतर्गत फीवर ओपीडी पुन्हा ज्येष्ठ नागरिक हॉल येथे सुरू करण्यात यावी अशी मागणी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षेनेते प्रितम म्हात्रे यानी केली होती. त्यानुसार त्वरित कार्यवाही करून सदर केंद्र पुन्हा नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुरू केले. मात्र या ज्येष्ठ नागरिक हॉल येथील नागरी प्राथमिक केंद्र २ येथे आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी विरोधी पक्षेनेते प्रितम म्हात्रे यानी केली आहे.

            पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षेनेते प्रितम म्हात्रे यानी त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी नागरिकांचे तपासणीकरिता जमा झालेले रक्ताचे नमुने हे आईस पॅकमध्ये ठेवले जातात असे निदर्शनास आले. परंतु वाढती रुग्ण संख्या पाहता त्या ठिकाणी त्वरित रेफ्रिजरेटर ची आवश्यकता आहे. त्याठिकाणी नागरिकांचे वेगवेगळ्या प्रकारची माहिती नोंद करण्यासाठी तसेच जमा झालेली माहिती ही मुख्य केंद्रांमध्ये पाठवण्यासाठी कम्प्युटर आणि प्रिंटरची व्यवस्था नाही ती सुद्धा त्वरित करावी. त्या ठिकाणी सध्या भरती केलेल्यांपैकी अजून एक डॉक्टर आवश्यक आहेत्यांची सुद्धा नेमणूक जलद करण्यात यावीकारण की सद्यस्थितीत तेथे उपलब्ध असलेले डॉक्टरांची संख्या ही कमी आहे. सदर केंद्राच्या बाहेर नागरिकांना उभे राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही आणि भर दिवसा ऊन्हामध्ये नागरिक तेथे रांगा लावतात तर त्याठिकाणी शेडची सुद्धा त्वरित व्यवस्था करावी. अशा प्रकारच्या मागण्या विरोधी पक्ष नेते -प्रितम जनार्दन म्हात्रे, पनवेल महानगरपालिका, डॉ. सुरेखा मोहोकर नगरसेविका, सारिका भगत नगरसेविका, प्रज्योती म्हात्रेनगरसेविका,  प्रीती जॉर्ज-म्हात्रेनगरसेविका यानी केली आहे.

       अशा प्रकारच्या काही गोष्टी विरोधी पक्षनेत्यांच्या निदर्शनास आल्या आहेततरी आयुक्तानी या गोष्टींची गंभीर दखल घेऊन त्वरित या केंद्रावर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.


 

 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर