शेतकरी कामगार पक्ष आणि तेरणा मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न
शेतकरी कामगार पक्ष आणि तेरणा मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न
पनवेल : 15 एप्रिल रोजी किड्स गार्डन स्कूल, सुकापूर येथे रक्तदान शिबिर पार पडलं .या शिबिरामध्ये अतिशय साधानगिरीने सर्व शासकीय नियम लक्षात घेऊन गर्दी होऊन न देता देखील तब्बल 65 जणांनी रक्तदान केले. शिबिराचं उदघाटन शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते गणेश भाऊ केणी आणि भगवान बुधाजी म्हसकर यांच्या शुभ हस्ते झाले. प्रत्येक रक्तदात्याला रक्तदानासाठी वेळ ठरवून दिलेली होती त्यामुळे उगाचच गर्दी होण्याचा प्रश्न उद्भवला नाही
देशभर कोरोना स्थिती आणि रक्ताचा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे शेकाप तालुका चिटणीस राजेश गणेश केणी यांनी सांगितले
सामाजिक परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाने देशसेवेला हातभार लावणं गरजेचं आहे आपण केलेलं रक्तदान एखाद्याचा जीव वाचवू शकतं, किंबहुना आपल्यापैकी कोणालाही रक्ताची गरज लागू शकते .त्यामुळे शेकाप च्या वतीने तालुक्यात इतर ठिकाणी देखील रक्तदान शिबिर आयोजित करणार असल्याचे राजेश केणी यांनी सांगितले. शेकाप चे पालीदेवद ग्रामपंचायत सदस्य यांचा लग्नाचा वाढदिवस होता त्यांनी सपत्नीक रक्तदान केले.
यावेळेस तेरणा मेडिकल ट्रस्ट चे नितीन पाटील आणि त्यांची सर्व टीमचे राजेश केणी यांनी आभार मानले कारण रक्तदानाची वेळ सकाळी 2 वाजेपर्यंत असताना दुपारी 3:30 pm पर्यंत रक्तदान करून घेतले.त्याचप्रमाणे नागरिकांनी कोणत्याही क्षणी संपर्क साधल्यास शेकाप कार्यकर्ते मदतीसाठी धावून येतील असे सांगितले मागील एप्रिल मध्ये शेकाप च्या वतीने 740 रक्त बॅगा शिबिराच्या माध्यमातून दिल्या गेल्याची आठवण राजेश केणी यांनी करून दिली.
या कार्यक्रमासाठी तालुका चिटणीस राजेश केणी,मा. सदस्य चंद्रकांत पाटील, ग्रा.सदस्य संदीप म्हसकर,मा. सदस्य प्रभाकर केणी, नरेश केणी, अनिल उलवेकर,संजय रमेश केणी,वासुदेव बडे, ग्रा प सदस्या आशाताई उलवेकर ,निखिल म्हात्रे,उनत्ती गावंड मॅडम, सौ नेहा नरेंद्र शर्मा आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment