करवाढी विरोधात विरोधी पक्षाची पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निदर्शने, सत्ताधार्यांची दुटप्पी भूमिका


 करवाढी विरोधात विरोधी पक्षाची पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निदर्शने, सत्ताधार्यांची दुटप्पी भूमिका

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी नागरिकांवर लादलेल्या जाचक कराविरोधात 22 मार्च रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निदर्शने केली व जोपर्यंत पालिका मालमत्ता कराबाबत विशेष सभा आयोजित करत नाही तो पर्यंत पालिकेच्या कुठल्याही सभेत विरोधी पक्षाचे सदस्य हजेरी लावणार नाही अशी भूमीका देखील यावेळी घेतली. जर पुढच्या 10 दिवसांमध्ये विशेष सभा आयोजित करण्यात आली नाही तर महाविकास आघाडीतर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल. अशी भूमिका घेतल्यानंतर महापौरानी येत्या आठ दिवसात सभा लावणार असल्याचे सांगितले.

           मालमत्ता करवा संदर्भात 17 जानेवारी 2019 रोजी 46-25 या बहुमताने मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात ला. याला महाविकास आघाडीच्या 25 नगरसेवकांनी विरोध केला होता. महानगरपालिका हद्दीत पाच वर्षे कोणताही नवीन दर लागू नये अशी भूमिका महाविकास आघाडीने त्यावेळी घेतली होती. आणि आजही घेतलेली आहे. कर वाढीला नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात विरोध आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष सभागृहात कर दरवाढीला मंजुरी देतो आणि दुसरीकडे दरवाढ कमी करू असे सांगितले जाते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून दुटप्पी भूमिका मांडली जाते. नागरिकांच्या समस्यांशी सत्ताधाऱ्यांना काही देणेघेणे नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 22 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत जाऊन विरोधी पक्षाने (महाविकास आघाडी) दरवाढीविरोधात निदर्शने केली. सत्ताधारी पक्षातील सदस्य ऑनलाईन सभेला गुपचुप येऊन बसतात त्यामुळे त्यंच्यावर कारवाई कोण करणार ? विरोधी पक्ष जेव्हा जनतेचे प्रश्न मांडते तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांचा आवाज म्यूट केला जातो. जनतेशी संबंधित असलेले प्रश्न मांडता येत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेली पीठासीन अधिकारी यानी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. कर वाढीबाबत सत्ताधारी दुटप्पी भूमिका मांडत असल्याचा आरोप करण्यात आला.  

                जनतेशी संबंधित विषय असल्याने महापौरानी महाविकास आघाडीच्या सदस्यासोबत करने आवश्यक होते. मात्र पीठासीन अधिकारी म्हणून जो अधिकार आहे, त्याचा वापर करून त्यानी वेळ मारून नेली. त्यानंतर पत्रकार यांना क्षाच्या बाहेर काढले. यावेळी महाविकास आघाडी व विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पत्रकारांना बाहेर काढल्याच्या या घटनेचा निषेध केला. यावेळी नवीन कर लावू नये अशी आमची मागणी आहे असे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी सांगितले. कर वाढ विरोधात नागरिकांचा आक्रोश आहे. नवीन कोणताही कर लावू नये अशी महाविकास आघाडीची ठाम भूमिका आहे. यावेली डॉ.सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, गोपाळ भगत, प्रज्योति म्हात्रे, रवी भगत, कमल कदम, प्रिया भोईर, विष्णू जोशी, अरुणा दाभने, उज्वला पाटील, ज्ञानेशवर पाटील, गणेश कडू, शंकर म्हात्रे, सतीश पाटी, विजय खानावकर, मंजुळा कातकरी आदी उपस्थित होते.

 

मालमत्ता करवा संदर्भात 17 जानेवारी 2019 रोजी 46-25 या बहुमताने मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात ला. याला महाविकास आघाडीच्या 25 नगरसेवकांनी विरोध केला होता. महानगरपालिका हद्दीत पाच वर्षे कोणताही नवीन दर लागू नये अशी भूमिका महाविकास आघाडीने त्यावेळी घेतली होती. आणि आजही घेतलेली आहे. -प्रितम म्हात्रे विरोधी पक्षनेतेपनवेल महापालिका

विरोधी पक्ष जेव्हा जनतेचे प्रश्न मांडते, तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांचा आवाज सभे दरम्यान म्यूट केला जातो. कर वाढीबाबत सत्ताधारी दुटप्पी भूमिका मांडत आहेत. - गणेश कडु, नगरसेवक

करवाढी विरोधात नागरिकांचा आक्रोश आहे. नवीन कोणताही कर लावू नये अशी महाविकास आघाडीची ठाम भूमिका आहे. -सतीश पाटिल, राष्ट्रवादी, नगरसेवक  

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर