कळंबोली,खारघर या सिडको नोडमधील २२ कोटीच्या कामांना मंजूरी

 कळंबोली,खारघर या सिडको नोडमधील २२ कोटीच्या कामांना मंजूरी

ऑनलाईन सभा असतानाही सरकारच्या नियमांना पायदळी तुडवत 
विरोधकांनी केला सभेत शिरकाव 
विरोधकांच्या चुकीच्या वागणुकीवर कारवाई करण्याची मागणी 


पनवेल(प्रतिनिधी) महापालिका हद्दीतील सिडको नोड मधील कळंबोली आणि खारघर येथील २२ कोटी रुपयांच्या विकासकामांना आज (दि. २२ मार्च) सर्वसाधारण महासभेत मंजूरी देण्यात आली आहे.  महापालिका स्थापन झाल्यापासून  हस्तांतरणाअभावी सिडको नोड मधील कामे करता आली नव्हती. त्यामुळे सिडकोनोड मधील कामांना पहिल्यांदाच मंजूरी देण्यात आली.
        पनवेल महापालिकेची दिनांक १८ मार्चची  तहकूब सर्वसाधारण सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आज (सोमवार, दि. २२)  ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली. यावेळी सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर आणि प्रभाग समिति सभापती, आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त सांडभोर उपस्थित होते.
        आजच्या सभेत पनवेल प्रभाग समिति अ मधील प्रभाग क्रमांक ४ खारघर गावामध्ये मूलभूत सुविधा पुरवणे, कळंबोली, खारघर येथील उद्याने व खेळाची मैदाने विकसित करणे या विषयांना मंजूरी देण्यात आली.  पनवेल महापालिका प्रभाग समिती ब कळंबोली येथे मिळकत क्रमांक ५१७ ब  जागा महाराष्ट्र शासन, वनपरिक्षेत्र  अधिकारी, सामाजिक वनीकरण, पनवेल यांना भाड्याने देण्याबाबतचा विषय प्रभाग समिती 'ब' सभापती समीर ठाकुर  यांनी या ठिकाणी महापालिकेची एखादी वास्तु किवा आरोग्य केंद्र होऊ शकते का याची पडताळणी करावी अशी मागणी केल्याने यासाठी हा विषय स्थगित ठेवण्यात आला.
     दरम्यान,  मालमत्ता कराबाबत स्थायी समिती सभापती संतोष  शेट्टी यांनी मला पत्र दिले  होते. त्यावर चर्चा करण्यासाठी प्रशासनाला विशेष महासभा आयोजित करण्यास सांगितलेले असताना त्याचे श्रेय घेण्यासाठी  विरोधकांनी  महासभेपूर्वी  कोणतीही  पूर्वसूचना न देता सभागृहात प्रवेश करणे चुकीचे होते . कोरोंनामुळे उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने  ऑन लाइन सभा घेत असताना त्यांनी  सभागृहात येणे चुकीचे होते, असे महापौर डॉ. कविता चौतमोल म्हणाल्या.  
        महाराष्ट्रात ज्या विकास आघाडीचे सरकार आहे.  त्या सरकारने कोरोंनामुळे जी नियमवाली दिली आहे. त्याप्रमाणे महापालिकेची महासभा घेण्यात येत असताना सरकारचे नियम त्यांनी पायदळी तुडवले त्याचा मी निषेध करीत आहे. लग्नाला, कार्यक्रमांना ५० माणसांचे बंधन आहे. त्याचे पालन आम्ही विरोधक असूनही करीत असताना, सरकारचा अपमान करण्याचे काम महाविकास आघाडीच्या येथील नगरसेवकांनी केले आहे. ते सभागृहात येऊन केले हे निंदनीय आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची उपमहापौर म्हणून माझी मागणी आहे, असे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर