पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे " सकाळ सन्मान पुरस्काराने सन्मानित.
पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे " सकाळ सन्मान पुरस्काराने सन्मानित
पनवेल : रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी "सकाळ सन्मान पुरस्कार" देऊन पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे याना गौरविले. जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लॉकडाऊन काळात आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतः प्रितम म्हात्रे यांनी असंख्य गरजूंना मदत केली. या कार्याची दखल घेऊन जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा यथोचित गौरव संस्थेचे अध्यक्ष तसेच पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना सुपूर्द करून सन्मान केला.
सन २०२० हे वर्ष कोरोना विषाणू साथीचा आजार, लॉकडाऊन, मास्क व सॅनिटाझरसोबत जगण्याच्या लढ़ाईत निघून गेले. कोरोना मुले अनेक जणांचे आयुष्य विस्कळीत झाले. कोरोना विषाणूच्या प्रसाराने मानवतेचे दर्शन घडवले. अनेक ठिकाणी नागरिकांना अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीचे संकट आले, काहींनी तर आपल्या आपल्या राज्यात जाऊन राहणे पसंत केले मात्र अशा महाभयंकर परिस्थितीत देखील काही मनुष्यरूपी देवांचेही दर्शन समाजाला झाले. कोरोना संकटात अनेक थोर महान माणसांनी सढळ हस्ते नागरिकांना मदत केली तर अनेक योद्धयांनी कोरोना काळामध्ये देखील जीवाची पर्वा न करता फक्त समाजासाठी काम केले. पनवेल सारख्या महान नगरीत देखील डॉ. प्रितम जनार्दन म्हात्रे या मनुष्यरूपी देवाचे दर्शन पनवेलकरांना झाले. त्यांनी कोरोना काळामध्ये असंख्य नागरिकाना मदत केली. पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना सकाळ सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पनवेलच्या जनतेसाठी निश्चितच हि गर्वाची बाब आहे. प्रितम म्हात्रे याना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पनवेलमधील सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. दिनांक ३० जानेवारी २०२१ रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
हा सन्मान आमच्या जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेची नैतिक जबाबदारी समजत, कोविड काळात देशातील, महाराष्ट्रातील, माझ्या जिल्ह्यातील समाज बांधवांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान आहे.- प्रितम म्हात्रे, पनवेल महानगर पालिका- विरोधी पक्षनेते
Comments
Post a Comment