रक्तदान शिबिराचे आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन .
रक्तदान शिबिराचे आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत 4 फेब्रुवारी 2021 वाहतूक शाखा कळंबोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पनवेल विभागीय पोलीस उपायुक्त शिवराज पाटील,पुरुषोत्तम कऱ्हाड, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, कळंबोली वाहतूक पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार, अभिजीत मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस प्रशांत पाटील, नगरसेवक सतीश पाटील, नगरसेवक रवींद्र भगत, माजी नगराध्यक्ष सुनील मोहोड, नगरसेवक प्रमोद भगत, माजी नगरसेवक शिवदास कांबळे तसेच पोलीस कर्मचारी व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत रक्त संकलन केले गेले. तसेच जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी केली गेली. त्यामध्ये निर्माण डायग्नोस्टिक सेंटर यांच्या नियोजनाखाली प्रथमोपचार, सी. बी. सी. चेक, रक्तदाब,टेम्परेचर, शुगर, ऑक्सिजन, इतर आजारांची मोफत तपासणी करुन तज्ज्ञांकडून मोफत सल्ला" दिला गेला. तसेच प्रत्येक तपासणी करणाऱ्या नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियम गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. अपघातात रक्त सांडवून जीव गमावण्या पेक्षा रक्तदान करणे कौतुकास्पद ठरेल. असे मत आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी वाहतूक पोलीस कर्मचारी , स्थानिक विविध संघटनांचे पदाधिकारी आणि रहिवासी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Comments
Post a Comment