श्रीवर्धन मध्ये नेटवर्क नसल्यामुळे तालुका संपर्क क्षेत्राबाहेर, जनतेचे होत आहेत हाल, लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष्य देतील का? मोबाईल कंपन्या विरोधात माजी जि. प. सदस्य अविनाश कोलंबेकर यांचे प्रांतांना निवेदन.
श्रीवर्धन मध्ये नेटवर्क नसल्यामुळे तालुका संपर्क क्षेत्राबाहेर, जनतेचे होत आहेत हाल, लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष्य देतील का?
मोबाईल कंपन्या विरोधात माजी जि. प. सदस्य अविनाश कोलंबेकर यांचे प्रांतांना निवेदन
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात सर्वच कंपन्याची मोबाईल नेटवर्क यंत्रणा वारंवार खंडीत होत असल्यामुळे नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या मनात आक्रोश आणि संताप निर्माण झाला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती, सर्व बँका, एम.एस.ई.बी. (विद्युत) कार्यालय, पोलीस स्टेशन व एकंदरीत सर्वच शासकीय कार्यालयांत मोबाइल नेटवर्कचा वारंवार फज्जा उडाल्यामुळे लोकांच्या कामामध्ये दिरंगाई होत असून तसेच शासनाच्या ऑनलाईन शिक्षणप्रणालीमुळे विद्यार्थ्यांना नेट नसल्याने अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
नागरिकाना शासकीय कामानिमित्त जवळपास 30 ते 35 की.मी. चा प्रवास आणि पैसे खर्च करुन श्रीवर्धन येथे जावे लागते, परंतू कार्यालया मध्ये पोहोचल्या नंतर तेथील कर्मचाऱ्यांकडून नेहमी नेट नाही हे ठेवणीतले उत्तर मिळते, त्यामूळे लोकांची काम तर होतच नाही परंतू वेळ आणि पैसा दोन्हीनी वाया जातो.
श्रीवर्धन पर्यटन स्थळ असल्यामुळे अनेक पर्यटक विविध ठिकाणाहून येत असतात, दक्षिणकाशी म्हणून प्रसिध्द असलेले हरिहरेश्वर व दिवेआगारतील सुवर्ण गणेश प्रकट झाल्यापासुन अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे, थोड्या फार प्रमाणात स्थानिक नागरिकाना रोजगार देखील उपलब्ध झालेला आहे, परंतू सर्वच मोबाइल कंपन्यानचे नेटवर्क समस्या असल्यामुळे पर्यटकांना लॉज आणि हॉटेल बुक करताना तांत्रिक दृष्ट्या खुपच अडचणीचा सामना करावा लागतो आणि नेट नसल्या कारणाने एटीएम चा देखील बोजवारा उडालेला असतो.
श्रीवर्धन तालुक्यातील चाकरमनी कामा निमित्त देश, विदेशात स्थलांतरीत आहेत, परंतू त्याना आपल्या गावी संपर्क करावयाचा असल्यास नेटवर्क मुळे अडचणी निर्माण होत आहेत.
मोबाइल कंपन्या रीचार्ज विषयी ग्राहकांना विविध प्रकारचे प्रलोभन (आमिष) दाखवून आकर्षित करतात, परंतू प्रत्यक्षात मोबाईल रीचार्ज करुन झाल्यानंतर नेट च नसल्या कारणाने संपुर्ण Data (MB) ग्राहकांकडून वापरलाच जात नाही, परिणामी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे, ग्राहक कायद्या (Act) अंतर्गत या पुढे सर्व मोबाईल कंपनी विरोधात का जाऊ नये? असा प्रश्न मोबाइल ग्राहकांना पडला आहे. सदर नेटवर्कची सुविधा लवकरात लवकर पुर्ववत न झाल्यास ग्राहकांमार्फत उग्र स्वरुपाच आंदोलन छेडण्यात येईल, लोकहितासाठी नेटवर्क यंत्रणा लवकरात लवकर सुधारावी, असे निवेदन प्रांत यांना देताना मा. जि. प. सदस्य अविनाश कोलंबेकर, पांडुरंग चौले, मनोहर सावंत, सुरेश मिरगल, शैलेश तटकरे, सागर जाधव, मंगेश पोलेकर, प्रवीण दर्गे, राजेंद्र चांदोरकर, हर्षद खोपटकर, राम पाटील, असंख्य ग्राहक व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment