जगदीप भिवंडकर यांची खांदा कॉलनी शिवसेना शाखेस सदिच्छा भेट.
पनवेल:- केंद्रीय जीएसटी आयकर विभागाचे असिस्टंट कमिशनर जगदिप एस. भिवंडकर यांनी नुकतीच खांदा कॉलनी शिवसेना शाखा प्रमुख मंगेश पवार त्यांच्या विनंतीला मान देत शाखेला भेट दिली. त्यावेळी शिवसेना खांदा कॉलनी शहर शाखेतर्फे उपशहर प्रमुख संपत सुवर्णा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी तिथे खांदा कॉलनीतील शिवसेना पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी त्यांनी सर्वांशी संवाद साधून भविष्यात काही कामे असतील तर मदत करण्याची तयारी दर्शविली तसेच पुढील महिन्यात रक्तदान शिबीर आणि मेडिकल चेक अप कॅम्प ठेवण्यासाठी सहकार्य करतील असेही त्यांनी सांगितले.
जगदिप एस. भिवंडकर साहेब हे सध्या सेंट्रल जीएसटी आयकर विभाग अहमदाबाद येथे असिस्टंट कमिशनर म्हणून कार्यरत आहेत, वयाची 37वर्षे ते या विभागात काम करत असताना ते मुंबई, नवी मुंबई येथेही कार्यरत होते. या कारकिर्दीत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी अनेक शिखरे गाठली आहेत, श्री.भिवंडकर हे पेशाने असिस्टंट कमिशनर असले तरी त्यांनी सामाजिक स्तरावरही अनेकांना स्वहस्ते सढळ मदत केली आहे,त्यांनी कॅन्सर पेशंटसाठीही मोलाचे योगदान दिले आहे.लवकरच ते कॅन्सर पेशंट साठी मार्गदर्शन केंद्राची स्थापना करणार आहेत.
उत्तम व मनमिळावू व्यक्तिमत्व, कामामध्ये तत्परता आणि एकनिष्ठता अशा त्यांच्या कार्यशैली मुळे संपूर्ण विभागात त्यांनी एक वेगळाच ठसा उमटवला आहे.
श्री. भिवंडकर भारताकडून टेबल टेनिस टिमच्या कोचिंग ची धुरा उत्तमरीत्या सांभाळत देशासाठी 9 गोल्ड, 13 सिल्वर आणि 27 ब्राँझ पदकांची कमाई चायना, कॅनडा, युएई, आॅस्ट्रिया, ईरान, थायलँड, फ्रांस, जर्मंनी येथे अटकेपार भारताचा झेंडा रोवून यशस्वीरित्या 2001 ते 2010 या कालखंडात केली आहे. त्यांच्या याच खेळाडूवृत्तीचा गौरव करत असताना त्यांना प्रेसिडेंशियल अवार्ड, समाज शक्ती अवार्ड आणि लाईफ टाईम अचीवमेंट अवार्ड अशा अनेक अवार्ड्स ने सन्मानित करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment