रायगड जिल्ह्यात अवैध धंदे तेजीत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
रायगड जिल्ह्यात अवैध धंदे तेजीत
कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रायगड जिल्ह्यात मटका,जुगार व अवैध धंदे सध्या तेजीत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी या धंद्यावर त्वरित कारवाई करावी,अशी आग्रही मागणी प्रहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अड.काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी रायगड जिल्हाधिकऱ्यांना नुकतेच दिले आहे.
रायगड जिल्हा मधील जवळपास सर्वच पोलीस ठाण्याचा हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे,जुगार,मटका व गावठी दारू (घुगा) गुटखा विक्री होत आहे. रायगड पोलीस चुकीच्या कामांना खतपाणी घालत आहेत. हे सकृतदर्शनी दिसून येत आहे. परिणामी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण झाला आहे. हे माहिती असून सुद्धा रायगड पोलीस फ्कत बघायची भूमिका घेत आहेत. रायगड जिल्ह्यातील नागरिक पोलिसांच्या भ्रष्ट प्रवृत्तीला खूप त्रस्त झाले आहेत. पोलीस दलातील हप्तेखोर,कामचुकार,बेशिस्त, व बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांची, हाप्तेखोर पोलिसांच्या संप्तीची उघड चौकशी होणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्याधिशांमर्फत उच्चस्तरीय चौकशी करून कडक कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. असे अड. काशिनाथ ठाकूर यांचे म्हणणे आहे.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील मटका जुगार धंदा जोरदार सुरू आहे. आणि हा मटका जुगार हा खूप मोठ्या राजकीय माणसाचा आशीर्वाद असल्यामुळे राजरोसपणे चालू आहे. पोलीस किती दिवस राजकीय लोकांची धूनी धुवत बसणार अशी जनतेतून जहाल प्रतिक्रिया येत आहे. पोलिसांच्या या भ्रष्ट कारभाराला जनता आता चांगलीच वैतागली आहे. अनेक अवैध धांद्याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही आर्थिक तडजोडीत पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांच्या तक्रारी आहेत. मटका जुगारमुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली असून काहींचे संसार उद्ध्वस्त झाले असल्याने महिलांकडून मागणी वाढू लागली आहे. असे निवेदनात म्हंटले आहे.
Comments
Post a Comment