आंदोलन म्हसळा तालुका महावितरण विरोधात टाळा टोको व हल्लबोल
आंदोलन म्हसळा तालुका महावितरण विरोधात टाळा टोको व हल्लबोल
महावितरण कंपनी ने जनतेची पिळवणूक करायला सुरुवात केली असून महावितरण विरोधात टाळा टोको व हल्लबोल आंदोलन म्हसळा भाजपा तालुका अध्यक्ष श्री प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली आज संपन्न झाले.
यावेळी श्री.प्रकाश रायकर म्हणाले की महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटिस पाठवली आहे. काही ठिकाणी कनेक्शन तोडायला देखील सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील ४ कोटी जनेतला अंधारात टाकण्याचे पाप करणार्या महावितरणाच्या निषेधार्ह शुक्रवार दि ५ फेब्रुवारी रोजी भाजपाने राज्यभर मंडल स्तरावरील महाविरतण केंद्रावर टाळा टोको व हल्लबोल आंदोलन आयोजित केले आहे. कोरोना काळातील वीज बिल माफ करण्यात यावीत यासाठी अनेक मागण्या देखील करण्यात आल्या परंतु महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफ न करता उलट महावितरण कंपनी कडून नोटिस पाठवून कनेक्शन कट करून जनतेची पिळवणूक करायला सुरुवात केलेली आहे. सामान्य लोकांचे रोजगार बुडाले ते वीज बिल कसे भरणार? त्यांची पिळवणूक करणे कितपत योग्य आहे? असा सवाल भाजपा तालुका अध्यक्ष श्री प्रकाश रायकर यांनी केला आहे. म्हसळा तालुक्यातील नागरिक हे शांत स्वभावाचे आहेत. तरी महावितरण कंपनीने त्यांचा शांततेचा अंत पाहू नये. अन्यथा भविष्यत तालुक्यातील सर्व नागरिकांना एकत्रित करून जनआंदोलन करू व या होणार्या हानीस सर्वस्वी महावितरण कंपनीने जबाबदार राहील. अशा इशारा महावितरण कंपनीला देण्यात आला आहे. वीज बिल माफ करण्यात यावीत किंवा त्यावर सूट देण्यात यावी अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष श्री प्रकाश रायकर यांनी शेवटी केली. महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटिसाच्या निषेधार्थ मा.उप अभियंता म.रा.वी.वी. कंपनी यांना देण्यात आले.
यावेळी तालुका सरचिटणीस श्री.सुनील शिंदे, तालुका सरचिटणीस श्री.महेश पाटील, तालुका उपाध्यक्ष श्री.अनिल टिंगरे, तालुका उपाध्यक्ष श्री.प्रसाद विचारे, तालुका अध्यक्षा महिला मोर्चा प्रभारी सौ.सुनंदा पाटील, तालुका चिटणीस श्री. सुनील विचारे, तालुका सरचिटणीस युवा श्री.विजय पाष्टे, तालुका चिटनीस श्री. मनोहर जाधव, श्री.राजेंद्र चव्हाण, श्री.शरद कांबळे, श्री.जितेंद्र नाक्ती, श्री.उद्देश पारदुले, श्री.धर्मा पाटील, श्री.रामचंद्र भुवड, श्री.सुभाष वाघे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment