भाजपच्यावतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन.

 


भाजपच्यावतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन 


पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने ' द्विस्तरीय शिवगान स्पर्धा २०२१' चे आयोजन करण्यात आले आहे. 
    महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली हि स्पर्धा होणार असून हि स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तिगीत, आरती, ओवी, ललकारी,अभंग, आदी प्रकारच्या गीतांची असणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. प्राथमिक फेरी मंगळवार दिनांक ०९ फेब्रुवारीला पनवेल येथे होणार असून अंतिम फेरी १९ फेब्रुवारीला सातारा येथील अजिंक्यतारा गड येथे होणार आहे. हि स्पर्धा खुली असून यात महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकास सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरावर व अंतिम फेरी राज्यस्तरावर होणार आहे.  
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अधिक माहितीकरिता पनवेल- गणेश जगताप- ९८७०११६९६४, संजीव कुलकर्णी - ९९८७०१५६८३, कामोठे-  भागराज चौधरी ७९७७७८७६७०, सुशील शर्मा ९९२०७०७६१०, पनवेल ग्रामीण- मंगेश वाकडीकर ९८७०२२९५४५, उरण- मनोहर जामकर  ९७५७१६५२६३, परेश तेरडे ९८३३९८७०८०, निखिल म्हात्रे ९८७०७०३९०१, कर्जत- बल्लाळ जोशी  ९८८१५४०९१७, वेदांती गोडबोले ९३७१४८१८३८, चैतन्य भागवत ८३२९१४३८२४, खारघर- उमेश चौधरी ९३२४८२४२०५, मोतीराम कडू ९३२२५०२३८८, खोपोली- उज्वला दिघे ७९७२०९१४५५, निशा दळवी ९८२३४१५३१५, खालापूर- शशिकांत मोरे ९४०४८०८६८६, प्रविण जांभळे ९०११७९६१०८, कळंबोली- दिलीप बिष्ट  ७३०४७१८८८०, संजय दोडके ९९८७००८४४२, वैशाली रेडकर ९९६९६९३२८९, यांच्याशी संपर्क साधावा. 
          या स्पर्धेत उत्तर रायगड जिल्हयातून अंतिम फेरीकरिता स्पर्धकांची निवड होणार असून त्याकरिता भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस रक्कमेचे पारितोषिके देण्यात येणार आहेत. उत्तर रायगड जिल्हा प्राथमिक फेरीत वैयक्तिक गीत गायन स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास ०७ हजार रुपये, द्वितीय ०५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास ०३ हजार रुपये, तसेच सांघिक गीत गायन स्पर्धेतील विजेत्या संघास ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार ५०० रुपये, तर तृतीय क्रमांकांस ५ हजार १०० रुपये आणि प्रत्येक विजेत्यास स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत उत्तर रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी केले आहे. 
Attachments area

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर