देवदूत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 'सकाळ सन्मान २०२१' ने सन्मान.


 देवदूत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 'सकाळ सन्मान २०२१' ने सन्मान 


पनवेल (हरेश साठे) राजकारण न करता माणुसकीचे नाते, सर्वधर्म समभाव, सामाजिक बांधिलकी जपणारे देवदूत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोरोना काळात समाजाप्रती दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल 'दै. सकाळ' च्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त 'सकाळ सन्मान २०२१' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
         कोरोना वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करत देवदूताप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रामाणिक कार्य केले. कोरोनाच्या आव्हानात्मक काळात कोरोनावर मात करण्यासाठी मोलाची भूमिका बजाविणारे सेवाव्रती देवदूत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेले कार्य संस्मरणीय आणि अग्र स्थानावर आहे.  राजकारण पेक्षा समाजकारणाला महत्व देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंच्या मदतीसाठी कधीही राजकारण केले नाही, सदैव आपल्याकडून कशी मदत होईल याचाच त्यांनी विचार केला. त्यामुळे लोकांवर आलेले कोणतेही संकट असो ते आपले आहे असे मानून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हाताने समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून काम केले. त्यामुळे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही त्यांची जनमानसावर प्रतिमा कोरली गेली. गेली अनेक वर्षे जनतेच्या लहानमोठ्या प्रश्नांकडे बारकाईने आणि जातीने लक्ष देणारे व सतत माणसांमध्ये रमणारे लोकनेते रामशेठ ठाकूर कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेकांची उपजीविका अडचणीत आली. माणूस केवळ दौलतीने मेाठा होत नाही तर तो दानतीने आणि माणुसकीने मोठा होतो. याचे जिवंत उदाहरण म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. 
         कोरोना महामारी मध्ये आपल्या दानतीचे व माणुसकीचे दर्शन देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लाखो जणांना मदतीचा हात दिला. त्यांनी स्वखर्चातून दिड लाखाहून अधिक अन्नधान्याचे किट, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नछत्र, गावाला जाण्यासाठी मदत, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्वछता मोहिम, आर्थिक मदत, याखेरीज अर्सेनिक अल्बम गोळ्या, सॅनिटायझर, मास्कचे वाटप, गणपती सण गोड करण्यासाठी ६० हजार जणांना प्रसादासाठी अन्नधान्य, अशी हरएक आवश्यक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांना झाली. महापूर असो किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती गोरगरिबांना मदत करणारे, विविध सामाजिक उपक्रम राबविणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने समाजाला कल्पवृक्ष मिळाला आहे त्यांचे कार्य समाजाला आदर्श आहे, त्यामुळेच त्यांना समाजात मान सन्मान आणि त्यांच्या शब्दाला किंमत आहे.  त्यांनी कोरोना काळात समाजाला स्वतःचे कुटुंब मानून केलेल्या मदतीची व दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'यापूर्वीच कोरोना देवदूत' पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. त्याचबरोबर सकाळ समूहाने सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनी देवदूत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 'सकाळ सन्मान २०२१' पुरस्कारने सन्मान करून त्यांनी केलेल्या सेवाव्रतीप्रती आदर व्यक्त केला. 

चौकट- 
लोकनेते रामशेठ ठाकूर यांना आपला-परका हा भेदच मान्य नाही. समोर अडचणीत सापडलेला प्रत्येकजण आपला, या नात्यानेच ते सर्वांच्या संपर्कात आहेत. ' एक तीळ सात जणांनी वाटून खावा!' ही आपली संस्कृती, या खऱ्याखुऱ्या लोकनेत्याने या दरम्यान प्रत्यक्षात आचरणात आणली. आपल्याकडील कष्टाने मिळवलेला खजिना अशा परिस्थितीने गांजलेल्या गरीब गरजूंना अक्षरशः रिकामा करून दिला. कितीतरी जणांना आसरा दिला. दोन वेळेला जेवण दिले,
तेही कुठल्याही प्रकारचा गवगवा न करता!.  विविध व्यवसाय, राजकीय आणि सामाजिक संस्था, शिक्षण, पत्रकारिता, वाहतूक, व्यापार, बांधकाम, मोलमजुर, हॉटेलिंग आणि इतर सर्वच छोट्या मोठ्या व्यवसायांशी संबंधित सर्वांची काळजी घेऊन, सगळे सुखरूप असल्याची माहिती विविध प्रकारे घेताना तर दिसलेच‌ पण या दरम्यान प्रत्यक्ष मदतीनेही या सर्वांचे अश्रू पुसण्याचे महत्कार्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर