आज महावितरणाविरोधात ``टाळा ठोको व हल्लाबोल`` आंदोलन.
आज महावितरणाविरोधात ``टाळा ठोको व हल्लाबोल`` आंदोलन
पनवेल(प्रतिनिधी) राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने चालविणे आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पनवेल तालुका व शहर भाजपच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. ०५ फेब्रुवारी) सकाळी १०. ३० वाजता भिंगारी येथील महावितरण कार्यालय येथे "टाळा ठोको व हल्लाबोल`` आंदोलन करण्यात येणार आहे.
महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणाच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२१ रोजी राज्यभर मंडलस्तरावरील महावितरण केंद्रांवर ``टाळा ठोको व हल्लाबोल`` आंदोलन होणार आहे, या आंदोलनात कार्यकर्ते व वीज ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment