महापालिकेतर्फे 9 आरोग्य केंद्राना मंजूरी, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश

 महापालिकेतर्फे 9 आरोग्य केंद्राना मंजूरी, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश

पनवेल : पनवेल महानगरपालिकेची महासभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहात 18 फेब्रुवारी रोजी पार पडली. या सभेत महापालिकेतर्फे 9 आरोग्य केंद्राना मंजूरी देण्यात आली आहे. पालिका हददित आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी यापूर्वी केली होती. त्यांच्या या मागनीला यश आले आहे.

         पनवेल महानगरपालिका हददित यापूर्वी फक्त सहा आरोग्य केंद्र कार्यरत होते. त्यापैकी दोन आरोग्य केंद्र पनवेल शहरातनवीन पनवेलकळंबोलीखारघरकामोठे अशी सहा आरोग्य केंद्र आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र नव्याने सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रेनगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकरप्रीती जॉर्जसारीका भगत हे 2018 पासून लेखी पाठपुरावा करत आहेत. या विषयाबाबत प्र



शासनाने वेळोवेळी माहिती दिली होती. 18  फेब्रुवारी  रोजी महासभेत नऊ ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश आले आहे. 

           50 हजार लोकसंख्येमागे एक आरोग्य केंद्राची आवश्यकता असताना फक्त सहाच आरोग्य केंद्र पनवेल पालिका क्षेत्रात कार्यरत होती. ग्रामीण भागात एकही आरोग्य केंद्र नसल्याने सर्व भार शहरी भागातील आरोग्य केंद्रावर येत असे. त्याच प्रमाणे खांदा कॉलनी येथे देखील आरोग्य केंद्र असावे याकरिता प्रितम म्हात्रे आग्रही होते. पालिका हददित नवीन आरोग्य केंद्र झाल्यास नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे. या सर्व बाबी प्रितम म्हात्रे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यामुळे पनवेल कार्यक्षेत्रातील लोकसंख्येनुसार नागरी प्राथमिक केंद्र सुरु करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी केली होती. त्यानुसार 

महासभेत 9 आरोग्य केंद्राना मंजूरी देण्यात आली आहे. याचा फायदा महापालिका हद्दीतील नागरिकाना होणार आहे. 



उभारण्यात येणारी आरोग्य केंद्र

तकका, पनवेल

खांदा वसाहत

कामोठे

नवीन पनवेल, पोदी

तलोजा मजकूर,

धानसर

तुर्भे

तोंडरे, नागझरी

टेंभोड़े, कलंबोली

 

आरोग्याच्या दृष्टिकोनातून 2018 पासून आम्ही आरोग्य केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आरोग्य केंद्र उभारण्यासाठी वेळ लागणार असल्याने तात्पुरत्या ठिकाणी भाडेतत्त्वावर आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावेत्याचप्रमाणे पालिका क्षेत्रातील आदिवासी पाडया करता फिरते आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे. आणि पदभरती देखील करण्यात यावी. -डॉ. प्रितम म्हात्रेविरोधी पक्षनेतेपनवेल महापालिका

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर