शिवसेना व कामगारांचा आधारवड हरपला मान्यवरांनी वाहिली सूर्यकांत महाडिक यांना श्रद्धांजली.
शिवसेना व कामगारांचा आधारवड हरपला मान्यवरांनी वाहिली सूर्यकांत महाडिक यांना श्रद्धांजली,
उरण : दि, २२ (घन:श्याम कडू) भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते व कामगारांचा आधारवड समजले जाणारे सूर्यकांत महाडिक यांच्या अचानक जाण्याने कधी ही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिवंगत कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम जेएनपीटी मल्टिपरपज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, कामगार नेते महेंद्र घरत, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, जेएनपीटी ट्रस्टी दिनेश पाटील, भूषण पाटील, माजी ट्रस्टी रवी पाटील, वकील विजय पाटील, जिप सदस्य विजय भोईर, ग्राहक कक्षाचे रमेश म्हात्रे, हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी. एन. डाकी, सुजाता गायकवाड, भावना म्हात्रे व कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कामगार नेते सूर्यकांत महाडिक हे शेवटच्या क्षणापर्यंत कामगारांच्या विशेषता मराठी माणसांच्या हक्कासाठी त्यांनी कोणतीही तडजोड न करता न्याय मिळवून देण्यात यशस्वी झाले होते. त्यांनी नेहमीच कामगारांचे हित पहाताना कधीच पक्षभेद केला नाही. प्रथम कामगार हा जगला तर देश प्रगती करेल असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे सूर्यकांत महाडिक हे कामगारांचे आधारवड समजले जात होते. ते शिवसेनेचे नेते तसेच बाळासाहेबांचे सच्चे सेवक म्हणून समजले जात होते. खासगीकरणाचे वारे वाहून कामगार देशोधडीला लागत असताना आज महाडिक यांनी नितांत गरज असतानाच काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले आहे. सूर्यकांत महाडिक यांच्या जाण्याने शिवसेनेबरोबर कामगारांची मोठी हानी झाली आहे. कामगारांवरील अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देणे हीच कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Comments
Post a Comment