पनवेल बसस्थानकातील शौचालयाची दुरुस्ती तातडीने करावी प्रभाग समिती ड सभापती सुशिला घरत यांची मागणी.

 पनवेल बसस्थानकातील शौचालयाची दुरुस्ती तातडीने करावी प्रभाग समिती ड सभापती सुशिला घरत यांची मागणी.

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या बसस्थानकावरुन घाटमाथ्यावर तसेच कोकणात जाण्यासाठी सोयीचे बसस्थानक आहे. या बसस्थानकावरुन रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या बसस्थानकाचे काम थांबलेले आहे. तसेच या ठिकाणच्या शौचालयाची दुरावस्था झाल्याने विशेषता महिला प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे पनवेल बसस्थानकातील शौचालयाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी प्रभाग समिती ड सभापती सुशिला घरत यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
या शौचालयाची अतिशय दयनिय अवस्था झाली असून स्लॅब गळत आहे आणि तो कधीही कोसळू शकतो. तसेच या शौचालयातून अत्यंत दुर्गंधी पसरत आहे. सध्याची कोवीडची परिस्थिती पाहता या शौचालयामुळे आणखी रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच या शौचालयाचे आउटलेट हे वसाहतीतील नाल्यामधून काढण्यात आले आहे. त्यामुळे येथे राहणार्‍या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे आउटलेट दुसरीकडे वळविण्यात यावे अशी मागणीही या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या गंभीर समस्येचा विचार करुन तातडीने शौचालयाची दुरुस्ती करावी अशी मागणी सुशिला घरत यांनी केली. तसेच त्यांनी पनवेल बसस्थानकाला भेट देवून पाहणी करुन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर