श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उदघाटन
श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियान कार्यालयाचे उदघाटन
पनवेल(प्रतिनिधी) श्रीराम मंदिर निर्माण संपर्क अभियानाच्या पनवेल येथील कार्यालयाचे उदघाटन मकरसंक्रातीच्या शुभमुहूर्तावर (गुरुवार, दि. १४) डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, संघाचे प्रांत सहकार्यवाह शरद ओगले, प्रांत सेवाप्रमुख शिरीष देशमुख, पनवेल शहर संघचालक प्रशांत कोळी, अभियान प्रमुख राजीव बोरा, अभियान सहप्रमुख गौरव जोशी, महिला संपर्क प्रमुख स्वाती कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिराला प्रारंभ झाला आहे. सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य 'श्रीराम मंदिर' साकारणार आहे. त्या अनुषंगाने देशव्यापी संपर्क व निधी संकलन अभियान सुरु होणार असून पनवेल नगरीतील संपर्क व निधी' संकलन कार्यालय गंगाकावेरी सोसायटी, गोदरेज प्लाझा समोर टिळक रॉड येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.
श्री राम मंदिर निधी संकलन अभियानाद्वारे सर्व स्वयंसेवक घरोघरी संपर्क करून नागरिकांना मंदिराची माहिती सांगण्याबरोबरच निधी संकलन करणार आहेत. त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रत्येक नागरिकाने श्री राम मंदिर उभारणीसाठी आपला खारीचा वाटा द्यावा असे आवाहन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले.
या मंदिराच्या निर्माणातून आणखीन एक मंदिर निर्माण होणार अस नव्हे तर ज्या संस्कॄतीचा आपणाला अभिमान आहे त्या संस्कॄतीच प्रतिक असलेल्या प्रभू राम मंदिराच निर्माण होणार आहे. या मंदिराच्या निर्माणातून आपल्या अस्मितेच तेजस्वी रूप साकारल जाणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ५०० वर्षाच्या संघर्षानंतर मिळालेल्या विजयातून निर्माण होणाऱ्या भव्य मंदिराचे आपण फक्त साक्षीदार होणार नसून त्याच्या प्रत्यक्ष उभारणीमध्ये सहभाग घेणार आहोत. आणि नुसते स्वत:च सहभागी न होता संपूर्ण समाजाला यामध्ये सहभागी करण्यासाठी हे अभियान असल्याचे शरद ओगले यावेळी म्हणाले.
प्रत्येकाने आपल्या मनातील निर्गुण स्वरूपातील रामाच जागॄतीकरण केल तर प्रथम आपल्या मनात त्यांच मंदिर तयार होईल. त्यानंतर हे सगुण स्वरूपातील भव्य मंदिराच कार्य सहजतेने पूर्ण होईल. रामनाम जपाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक कॄतीतून सदाचार आणि पुरूषार्थ जागॄत केला तर देशाला आणि विश्वाला पुढे नेण्याचे काम आपल्या हातून होईल, असे मनोगत डॉ. ययाती गांधी यांनी यावेळी व्यक्त केले.
Comments
Post a Comment