श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे-आडी मार्गावरील नादुरुस्त जावेळे पुलाला भेट देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी .

 





श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे-आडी मार्गावरील नादुरुस्त जावेळे पुलाला भेट देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी शेकाप नेते माजी आमदार पंडीत पाटील यांनी केली असतानाच शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने पत्र देत दळणवळणाच्या दृष्टीने त्वरीत आवश्यक तो निधी उपलब्ध करुन पूलाचे बांधकाम करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आशा पल्लवित झालेल्या ग्रामस्थांनी शेकाप नेते आ.जयंत पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.


श्रीवर्धन तालुक्यातील गालसूरे येथील गालसुरे-आडी हा पुल वडशेत वावे, साखरोने, धारवली, आडी, जावेळे, साखरी, कोंढे पंचतन या सात गावांचा दुवा आहे. या पुलामुळे या गावांतील राहणारे सुमोर साडेतीन हजार ग्रामस्थ इतर भागाशी जोडले जातात. जून महिन्यातील अतिवृष्टी दरम्यान कमकुवत झालेला हा पुल तग धरु न शकल्यामुळे कोसळला. त्यामुळे वडशेत वावे, साखरोने, धारवली, आडी, जावेळे, साखरी, कोंढे पंचतन या गावातील ग्रामस्थांचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटला गेला. तब्बल तीन महिने याकडे लक्ष द्यायला वेळच न मिळाल्याने या सात गावांतील ग्रामस्थांना मोठया समस्यांना सामोरे जावे लागले. अत्यंत हालअपेष्टेत दिवस काढल्यानंतर तीन महिन्यांनी पर्याय म्हणून बायपास मार्ग काढण्यात आला. त्यामुळे पुन्हा संपर्क सुरु होऊ शकला असला तरी त्यामुळे ग्रामस्थांचा त्रास मात्र कमी होत नाही. शेकाप नेते पंडित पाटील यांनी नुकतीच या पुलाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी या पुलाचे काम त्वरीत होण्याची मागणी राज्य शासनाकडे केली असून त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले.या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच पुलाअभावी वैदयकीय सुविधांवर परिणाम होऊ नये यासाठी त्यानुसार आ. जयंत पाटील यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र दिले आहे. 


यामुळे येथील ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेकापचे तालुका चिटणीस वसंत यादव यांनी जयंत पाटील आणि पंडित पाटील यांना धन्यवाद देत तातडीने पुलाचे काम मार्गी लागेल असा विश्‍वास व्यक्त करत ग्रामस्थांच्या हाल अपेष्टा संपतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर