ओम साई राम पदयात्री कामोठे व वशेणी पायी पालखीचे साई मंदिर वहाळ येथे जोरदार स्वागत.
ओम साई राम पदयात्री कामोठे व वशेणी पायी पालखीचे साई मंदिर वहाळ येथे जोरदार स्वागत.
उरण (सुनिल ठाकुर).सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा कामोठे येथील ओम साई राम मित्र मंडळ ची पायी पालखी दिंडी यंदा कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच पदाधिकारी व साई भक्ताना घेउन शासनाचे नियमांचे पालन करुन कामोठे ते साई मंदिर वहाळ अशी काढण्यात आली . सदर पायी पालखी दिंडी सकाळी ५:३० वाजता कामोठे येथील सेक्टर ६ येथील साई मंदिरात बाबांची आरती करुन पालखी गावातून फिरवून दिंडीचे वहाळ कडे प्रस्थान झाले. दुपारी १२ वाजता या दिंडीचे आगमन ओवले येथील साई मंदिरात मध्यान्ह आरती करुन संध्याकाळी ६ वाजता बाबांच्या आरती करिता साई मंदिर वहाळ येथे पोहचली.संध्याकाळी पायी दिंडी पालखी साई मंदिरात पोहचल्या वर साई पालखी दिंडीचे साई देवस्थान च्या वतीने देवस्थान चे अध्यक्ष रविंद्र का.पाटील, मा.जि.प.सदस्या पार्वती ताई पाटील, विश्वस्त जगन पाटील यानी जोरदार स्वागत केले. यावेळी रस्ता सुरक्षा मास हे नवी मुंबई पोलिस वाहतुक शाखेच्या वतीने अभियान पुर्ण महिना भर राबविण्यात येत आहे त्याला अनुसरुन सीबीडी बेलापुर वाहतुक शाखेचे पो.नि. शेलकर यानी उपस्थित साई भक्तांना वाहतुकीच्या नियमां बाबात मार्गदर्शन केले.यावेळी देवस्थान चे डी.के.पाटील,जगन पाटील,अनंत पाटील,विश्वास पाटील,एकनाथ ठाकुर दिंडीचे अध्यक्ष: बाबा साहेब दिघे.कुणाल भेंडे ,यश झेंडे,अक्षय डोंगरे,कणवेश म्हात्रे .सदाशिव जाधव,रमेश सरवडे,सखाराम पाटील,शंकर म्हात्रे प्रमोद भगत सुनील भेंडे मंगल दिघे. राधाबाई कुटे सुजाता थले सविता जोशी निशा जोशी संस्कृती खर्माळे आर्या कुटेमानसी दिघे आदी सह सभासद व साई भक्त उपस्थित होते
Comments
Post a Comment