दाऊदच्या डोंगरीत घुसून धडक कारवाई, एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ.
दाऊदच्या डोंगरीत घुसून धडक कारवाई, एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढदाऊदच्या डोंगरीत घुसून धडक कारवाई, एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ.
मुंबई : डॅशिंग एन सी बी अधिकारी समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे समीर वानखेडे यांनी “डी” कंपनीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. दाऊदच्या डोंगरीत घुसून त्यांनी कारवाई केली होती. इतकंच नाही तर दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्याही आवळल्या होत्या. समीर वानखेडे यांनी डोंगरीतील ड्रग्जची फॅक्ट्री उध्वस्त केली. जी फॅक्ट्री उध्वस्त केली त्या लोकांचे अंडरवर्डशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे . करीमलालाच्या नातुलाही समीर वानखेडे यांनी अटक केली होती. एवढंच नाही तर प्रति दाऊद आरीफच्या घरात घुसून समीर वानखेडे यांनी धाड टाकली होती. समिर वानखेडेंनी दाऊदच्या साम्राज्याला थेट हात घातला. त्यामुळे समीर वानखेडेंचे सर्वच ठिकाणांहून कौतुक केलं जातंय.
दोन महिन्यांपूर्वी समीर वानखेडेंसह एन सी बी च्या पथकावर हल्ला
दोन महिन्यांपूर्वी २३ नोव्हेंबरला मुंबईतील गोरेगाव परिसरात ड्रग्ज पेडलर्सला पकडण्यासाठी गेलेल्या एन सी बी च्या पथकावर काही जमावाने हल्ला चढवला होता. यात डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंसह त्यांच्या टीममधील पाच जणांवर या ड्रग्ज पेडलर्सने हल्ला केला होता. यात एन. सी. बी. चे दोन अधिकारी जखमी झाले होते.एनसीबीचं पथक कॅरी मेंडिस नावाच्या ड्रग्ज पेडलर्सकडे छापेमारीसाठी गेले होते. त्यावेळी अचानक ५० ते ६० जणांच्या जमावाने तिथे गर्दी करत एनसीबीच्या पथकावर हल्ला केला. कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची संपूर्ण टीमला या हल्ल्याचा जबरदस्त धक्का बसला. या हल्ल्यात एनसीबीचे विश्वविजय सिंह आणि शिवा रेड्डी असे दोन अधिकारी जखमी झाले होते.
Designing Courses,
Printing,
News paper
All formats avilable here,
contact : 8652654519.
Comments
Post a Comment