पर्यटकांच्या गाडीचा वेग आणि म्हसळ्याचे आर्थिक गणित.


 पर्यटकांच्या गाडीचा वेग आणि म्हसळ्याचे आर्थिक गणित

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गापासुन २७ किमी अंतरावर आणि माणगाव-श्रीवर्धन रस्त्यावर असलेले म्हसळा सुमारे वीस हजार लोकसंख्या असलेले तालुक्याचे  नैसर्गिक दृष्टीने समृद्ध, पण विकासापासून वंचित त्यामुळे अर्थिक दृष्टीने मागासलेले असलेले परंतु अर्थिक उन्नती घडवून आणण्यासाठी अनेक संधीनी युक्त असलेले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही कालावधी नंतर स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झालेले एक ग्रामीण शहर.अलिकडील काळात नव्याने विकसित होणारे दिघी, आगरदांडा आणि रोहीणी बंदर तसेच दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्ग , दिवेआगर, वेळास,आदगाव,श्रीवर्धन, हरिहरेश्वर या पर्यटन नकाशावर प्रसिद्ध असणारी पर्यटन स्थळे आणि त्याचा  होणारा विकास तसेच मुंबई जवळचे तिसरे विकसित होऊ पहाणारे शहर  यामुळे आज म्हसळा शहराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे आज दर शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी सुमारे पाच हजार पर्यटक आणि जर जोडून सुट्या आल्या तर सरासरी दिवसाला दहा हजारापेक्षा जास्त  पर्यटक म्हसळ्यातील रस्त्यावरचा धुरळा उडवत या शहरातून दिवेआगर, हरीहरेश्वर, श्रीवर्धन, वेळास,आदगाव, मुरुड जंजिरा याठिकाणी जातात परंतु नैसर्गिक दृष्टीने समृद्ध असलेल्या म्हसळ्यात  कोणताही विकसित झालेले आणि पर्यटनाच्या नकाशावर प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ नसल्याने, भारत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुनच नव्हे तर जगातील अनेक देशांमधुन आलेले  हे पर्यटक सुसाट वेगाने श्रीवर्धन, दिवेआगर आणि हरीहरेश्वर या पर्यटन स्थळी निघुन जातात.  या पर्यटकांच्या गाडीचा वेग जर काही काळासाठी म्हसळ्यात कमी करण्यात म्हसळ्यातील ग्रामस्थ, स्थानिक स्वराज्य संस्था यशस्वी झाल्या तर म्हसळ्यातील आर्थिक विकासाच्या गाडीची चाके वेगाने धावू लागतील त्यासाठी केवळ नवीन इमारती ,शाँपिंग माँल,बर्गर, पिझ्झा सेल स्पाँट निर्माण होऊन चालणार नाही कारण शहरातुन आलेल्या या पर्यटकांना त्यामध्ये नाविन्य वाटणार नाही त्यामुळे पर्यटकांना नाविन्यपूर्ण वाटेल अश्या गोष्टींची निर्मिती होणे गरजेचे आहे त्यासाठी घोणसे घाटात कृत्रिम आणि सुरक्षित सेल्फी पाँईट निर्माण करणे,देवघर कोंड याठिकाणचे दत्तमंदिर आणि अमृतेश्वर मंदिर परीसर विकसित करून त्याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणे, देहन नर्सरी परीसर आणि चिरगाव गिधाड संवर्धन प्रकल्प विकसित करणे म्हसळा बायपास मार्गावर खाजगी विकासकाच्या साह्याने पैठण,बंगलोर याठिकाणी असणाऱ्या बागां सारखी एखादी सुंदर बाग विकसित करणे, दर शनिवार - रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी म्हसळा बायपास मार्गावर खाद्य महोत्सव आयोजित करणे , सुकी मच्छी, काजु,आंबे फणस याचे कायमस्वरूपी स्टाँल उभारणे आणि म्हसळ्यातील वैशिष्ट्यपुर्ण वस्तुची आणि संस्कृतीची ओळख जर पर्यटकांना करून देण्यात आपण यशस्वी झालो आणि  पर्यटकांच्या चारचाकी गाडीचा वेग म्हसळ्यात कमी होऊन ते जर म्हसळ्यात काहीकाळासाठी कमीत कमी निम्मे पर्यटक जरी थांबविण्यात आपण यशस्वी झालो आणि या  पर्यटकांनी प्रत्येकी कमीत कमी शंभर रूपयांची जरी खरेदी केली तरी शनिवार ,रविवार ५००० गुणिले १०० याप्रमाणे ५०,००० आणि जोडून सुट्या असतील तर १०,००० गुणिले १०० याप्रमाणे १,००,००० रूपये म्हसळ्यातील शहरवासीयांच्या उत्पन्नात भर पडेल म्हजेच म्हसळ्यातील आर्थिक गाडीची चाके काहीप्रमाणात धावण्यासाठी आपल्याला पर्यटकांच्या गाडीच्या चाकांचा वेग काहीप्रमाणात म्हसळ्यात कमी  करता आला पाहिजे आणि त्यामध्ये जर आपण यशस्वी झालो तर आज महाराष्टातील अनेक शहरे यामार्गाचा अवलंब करून विकसित झाली आहेत तसाच आपल्या म्हसळा शहराचा विकास होण्यास मदत होईल.

प्रा.शिरीष समेळ

म्हसळा (रायगड)

8411919984

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर