पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांना लाच घेताना अटक.

 पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांना लाच घेताना अटक,

                             अलिबाग : पनवेल पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे हे ॲ
न्टी करप्शनच्या जाळ्यात अडकलेआहेत. सेवापट व एलपीसीसाठी लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अचानक झालेल्या या कारवाईने रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी वर्गामध्ये खळबळ उडालीआहे.


        आज (शुक्रवार, २९ जानेवारी) दुपारी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. प्रभारी गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सेवापट आणि एलपीसीसाठी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार आल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली आणि आज सापळा रचण्यात आला. जिल्हा परिषदेच्या एका दालनात ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना प्रभारी गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर