भारतीय जनता पार्टीने म्हसळा तालुक्यात केला विकास कामांचा शुभारंभ!
भारतीय जनता पार्टीने म्हसळा तालुक्यात केला विकास कामांचा शुभारंभ!
कोरोना कमी होताच आज म्हसळा तालुकामध्ये भारतीय जनता पार्टीने तर्फे इजिमा १२३ आडी महाड खाडी वरची वाडी रस्ता तयार करणे अंदाजित रक्कम १०.०० लक्ष, आडी जंगमवाडी शंकराच्या मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करणे ५.०० लक्ष व देवघर कोंड ते आणि ग्रामा ६५ ते इजिमा ८१ मार्ग तयार करणे अंदा रक्कम १५.०० लक्ष या कामांचे भूमिपूजन मा.जिल्हा नियोजन सदस्य तथा सदस्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी मा. श्री.कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही भूमिपूजन कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आता कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत असून सर्व व्यवहार पूर्व पदावर येत आहेत. या आपल्या ग्रामीण भागातील तरुण हा नोकरी धंद्याकरिता मुंबई व पुणे या सारख्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी गेलेला आहे पण या करोना काळात त्यांचे व्यवसाय, नोकरी,धंदे बंद झाले आहेत . आता महानगराची परिस्थिती फारच बदलली आहे तेथे नोकरी व्यवसाय संधी डिजिटल व्यवहारांमुळे कमी होत असून कोरोना काळात सर्व मुंबई व पुणे वासी युवक पुन्हा गावाकडे वळत आहेत. भविष्यात तरुण वर्गानी मुंबईकडे धाव न घेता स्थानिक ठिकाणी उद्योग धंदे सुरू करावे. गावाकडे आता सर्व तंत्रज्ञान उपलब्ध आहे, मोबाईल,इंटरनेट सेवा उपलब्ध आहे , दळणवळणा करिता रस्ते झाले आहेत जेणे करून तरुणांना आपल्या गावच्या विकासाकरिता सहभाग घेता येईल. आता गाव पातळीवर छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी संधी आहे, शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन आत्मनिरभर योजने अंतर्गत गावाकडे प्रशिक्षण घेऊन स्थाईक व्हावे असे युवकांना आवाहन केले आहे. भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष असून केंद्र सरकार विविध योजनेच्या माध्यमातून गावातील जनतेला न्याय देत आहे, आपण याचा अभ्यास करुन भविष्यात भाजपा मध्ये सामील व्हावे, काम वा़ढवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी तालुक्यातील सर्व विभागात कामे करण्यात यशस्वी झालो आहोत. भारतीय जनता पार्टी ने सत्तेच्या कालावधी मध्ये आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची विकास कामे केली आहेत व काही कामे मंजूर केली आहेत. श्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांचे श्रेय आजही इतर पक्ष घेत आहेत. म्हसळा नगरपंचायत निवडणूक जवळ आल्याने महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेल्या कामाचे उदघाटने व भूमिपूजन राष्ट्रवादीने पुन्हा एकदा नारळ फोडण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे मात्र जनता जागृत आहे. महाविकास आघाडी मधील तीन पक्षाच सरकार फक्त सत्ता मिळविण्यासाठी एकत्रित आले आहेत. यावेळी तालुका अध्यक्ष मा. श्री.प्रकाश रायकर, तालुका सरचिटणीस श्री. महेश पाटील, तालुका सरचिटणीस श्री. सुनील शिंदे, शहर अध्यक्ष श्री.संतोष पानसरे, तालुका उपाध्यक्ष श्री. अनिल टिंगरे, तालुका उपाध्यक्ष श्री.समीर धनसे, तालुका उपाध्यक्ष श्री. यशवंत म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष श्री.लहू तुरे, जिल्हा पदाधिकारी श्री.मुकेश आंबेकर, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. प्रियांका शिंदे, तालुका उपाध्यक्ष महिला सौ. रुपाली भायदे, श्री. रमेश पोटले, श्री.दिलीप कोबनाक, श्री.मनोहर जाधव, श्री.प्रशांत महाडिक, श्री.सुबोध पाटील, कु. जितेंद्र नाक्ती, श्री. शरद कांबळे, श्री.सुधाकर शिर्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी ही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
Comments
Post a Comment