बनावट किसान विकास पत्र व बनावट राष्ट्रीय बचत पत्र तयार करणारी टोळी जेरबंद.


 बनावट किसान विकास पत्र व बनावट राष्ट्रीय बचत पत्र तयार करणारी टोळी जेरबंद:-

शहरातील एचडीएफसी बँकेत बनावट पोस्ट खात्याच्या आधारे २ कोटींचे कर्ज काढून फसवणूक करायच्या उद्देशाने आलेल्या नांदेड येथील आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अधिक चौकशी केली असता या टोळक्याने मुंबईसह इतरही बँकांमध्ये कोट्यवधींची कर्ज प्रकरणे दाखल केली असल्याचे समोर आली तर नेरुळ येथील विश्वास नागरी पतसंस्थेतून १२ लाख रुपयांचे कर्ज उचलले असल्याची माहिती समोर आली आहे.
सदर आरोपीपैकी मुख्य आरोपी बाबाराव गणेशराव चव्हाण (२४) हा पुर्वी भारतीय डाक विभागात नदिड येथे पोस्ट मास्तर (डाक पाल) पदावर नोकरीस होता. तेथे त्याने हेराफेरी केल्याने त्याचेवर फौजदारी कारवाई करून त्याला निलंबीत करण्यात आले होती. त्याला पोस्ट खात्याचे कामकाजाची पूर्ण माहीती असल्याने त्याने व त्याचे इतर साथीदारांसह बनावट किसान विकास पत्र व राष्टीय बचत पत्रे तयार करुन तो विविध पतसंस्था व बँकामध्ये गहाण ठेवून बदल्यात कर्ज घेवुन विविध पतसस्था व बँकांची फसवणुक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच सदर आरोपींकडून बनावट दस्तऐवज व मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. यावेळी तपासात विश्वास नागरी पत संस्था, नवरत्न हॉटेल जवळ, नेरुळ, नवीमुंबई येथे ५०,००,०००/- रुपयांची भारतीय डाक विभागची बचत पत्र गहाण ठेवन १२,००,०००/- रुपये कर्ज घेतले तसेच HDF.C. BANK माहीम, मुंबई येथे २,००,००,०००/- रुपयाची, कला नागरी सहकारी बैंक, कुला, मुबई १,००,००,०००/- रुपयाची बनावट बचत पत्र गहाण ठेवून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सारस्वत बॅक, वाशी, पूसद सहकारी बैंक पनवेल, HDFC BANK पनवेल येथे बचत पत्र गहाण ठेवुन कर्ज घेण्याचा प्रयल केला. यावेळी एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पनवेल शहर पोलीस ठाण्याची मदत घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर