कामगार कल्याण मंडळ, पनवेलने साजरा केला प्रजासत्ताक दिन.

 


मगार कल्याण मंडळ
पनवेलने साजरा केला प्रजासत्ताक दिन.

पनवेल : कामगार कल्याण मंडळ पनवेल व पनवेल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह इस्टेटपनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट ली. चे अध्यक्षविजय लोखंडे जीबँक ऑफ महाराष्ट्रनवीन पनवेल शाखेचे अरविंद मोरेबँकेचे पनवेल शाखेचे शाखा प्रबंधकमहेश कुऱ्हेकरबँकेचे तळोजा शाखेचे शाखा प्रबंधकप्रशांत वाघमारेव्ही के श्रीवास्तवविजयकुमार पाटीलउद्योजक हर्षल सूचकसिद्धार्थ सूचकगौरव जोशीमॅनेजर डी.डी. सावंतसहाय्यक निबंधकसहकारी संस्थाश्रीमती शीतल महाले व कामगार कल्याण मंडळाचे केंद्र प्रमुखप्रवीण सकट आदी मान्यवर उपस्थित होते.

         कार्यक्रमाची सुरुवात विजय लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यानंतर राष्ट्रगीत होऊन मान्यवरांची भाषणे झालीत. या प्रसंगी विजय लोखंडे म्हणाले की अर्थव्यवस्था हळू हळू पूर्व पदावर आणण्यासाठी देश प्रयत्न करीत असून त्यात पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट युनिटचे सर्व सभासद हातभार लावत असल्यामुळे ह्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अर्थव्यवस्थेची घडी पूर्व पदावर आणण्यासाठी आपण सर्वानी प्रत्येकामध्ये राष्ट्रभावना जागृत करण्याची गरज या प्रजासत्ताक दिना निमित्त आहे असे सांगून त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे अरविंद मोरे म्हणाले कीउद्योग आणि बँक हे दोघे राष्ट्रउभारणीसाठी प्रयत्न करीत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या अथक परिश्रमाने संविधान तयार करून आपणास दिल्यामुळे आपली जबादारी आणि कर्तव्य यांचे जाण ठेऊन आपण राष्ट्राप्रती देणे लागत असून राष्ट्रभावना जागविण्याचे मोलाचे कार्य व संविधानाचे पालन आपण केले पाहिजे.

      बँक ऑफ महाराष्ट्राचे पनवेल शाखेचे शाखा प्रबंधक महेश कुऱ्हेकर म्हणाले कीआपले स्वास्थ व अर्थव्यवस्थेचे स्वास्थ चांगले ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. बँक ऑफ महाराष्ट्र विविध घटकांना कर्ज पुरवठा करीत असून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण आज प्रजासत्ताक दिनी संकल्प करूया कीआपण प्रत्येकाने देश प्रगतीसाठी हातभार लावूया. कार्यक्रमाचे प्रास्ताविकअतिथींचे स्वागत व आभार प्रदर्शन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळपनवेलचे केंद्र प्रमुख प्रवीण सकट यांनी केले.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर