राज्यस्तरीय 'अटल करंडक' स्पर्धेचा रविवारी पारितोषिक वितरण सोहळा.
राज्यस्तरीय 'अटल करंडक' स्पर्धेचा रविवारी पारितोषिक वितरण सोहळा ,
पनवेल(प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये होत असलेल्या राज्यस्तरीय सातव्या 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ०५ वाजता होणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर समारंभाध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांची उपस्थिती
नाट्य सिने क्षेत्रातील अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक् षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून भाजपचे सांस्कृतिक सेलचे प्रदेक्षाध् यक्ष ऍड. शैलेश गोजमगुंडे, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रसिद्ध सिने अभिनेते संजय नार्वेकर, प्रसिद्ध सिने अभिनेते जयंत वाडकर, लेखक, दिग्दर्शक व प्रसिद्ध अभिनेता अद्वैत दादरकर, प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख, प्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी, प्रसिद्ध अभिनेते भरत सालवे, प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अभिजित झुंझारराव, कवी व प्रसिद्ध अभिनेते राहुल वैद्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सकाळी ०९ वाजल्यापासून अंतिम फेरीतील उर्वरित सहा एकांकिकांचे सादरीकरण होणार असून एकांकिका तसेच पारितोषिक वितरण सोहळ्याला रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment