दिनांक २३/०१/२०२१ रोजी म्हसळा तालुक्यातील पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. श्री. हसनजी मुश्रीफ साहेब तसेच जिल्ह्याचे खासदार मा. श्री. सूनिलजी तटकरे साहेब उपस्थित होते.

 प्रति,

मा. संपादक साहेब,

रायगड मत,

रायगड. 


विषय - खालील बातमी आपल्या वृत्तपत्रात देण्याबाबत...!


महोदय,

               
दिनांक २३/०१/२०२१ रोजी म्हसळा तालुक्यातील पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी  ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. श्री. हसनजी मुश्रीफ साहेब तसेच जिल्ह्याचे खासदार मा. श्री. सूनिलजी तटकरे साहेब उपस्थित होते. 

              याप्रसंगी म्हसळा तालुक्यातील सर्व शिक्षणसेवकांनी एकत्र येऊन बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या शिक्षणसेवक मानधन वाढीच्या प्रश्नांच्या संदर्भात मा. श्री. हसन मुश्रीफ साहेब तसेच मा. श्री. सूनिलजी तटकरे साहेब यांना मानधन वाढीबाबत निवेदन दिले. निवेदनात बक्षी कमिटी खंड १ मधील प्रकरण २ मध्ये मुद्दा क्र. १ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केल्याप्रमाणे किमान वेतन १८००० रु. देण्याचे सुचविले आहे कारण सहाय्यक शिक्षक (परिविक्षाधीन)/ शिक्षणसेवक पदावर कार्यरत शिक्षकांना १७ मार्च २०१२ नंतर मानधन वाढ करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने ज्या गुजरात सरकारच्या विद्यासहायक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये जी शिक्षणसेवक योजना सुरू केली त्या गुजरात सरकारने दिनांक ०१/०२/२०१७ मध्ये विद्यासहायकांना सुधारित १९,९५०/- एवढी भरीव मानधन वाढ दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील सहाय्यक शिक्षक (परिविक्षाधीन) / शिक्षणसेवक यांना इतर नियमित वेतनश्रेणी लागू असणाऱ्या शिक्षकांप्रमाणे कोणतेही भत्ते, सवलती व संरक्षणाशिवाय केवळ ६००० या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. जे अन्यायकारक आहे. असे अभ्यासपूर्ण निवेदन मानधन वाढीबाबत सर्व शिक्षणसेवकांच्यावतीने देण्यात आले. यावेळी खासदार मा. श्री. सूनिलजी तटकरे साहेब यांनी विषय योग्य रित्या समजून वित्तमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्याशी बोलून शिक्षणसेवकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुक्यातील सर्व शिक्षणसेवक कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मूलभूत समस्येबाबत निवेदन दिले. 

   

                              आपला

          शिक्षणसेवक ता. म्हसळा जि. रायगड

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर