भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख अतिथी अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. करोना साथीच्या रोगामुळे शासनाच्या निर्देशानुसार, जास्त गर्दी होवू न देण्यासाठी या वेळी केवळ महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांनासंबोधीत करताना प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी म्हंटले कि, एक शिक्षक हजारो विद्यार्थी घडवत असतो आणि देशाचे भविष्य घडविण्याची अत्यंत महत्वाची जवाबदारी शिक्षकाची असते आणि त्यामुळे शिक्षकांसाठी निष्ठापूर्वक विद्यादानहे कार्य म्हणजे देशसेवाच आहे. त्यांनी प्रमुख अतिथी अर्चना परेश ठाकूर, यांचे तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कार्यकारणी सदस्य यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली
सोहळ्याच्या प्रमुख अतिथी अर्चना परेश ठाकूर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी नमूद केले की, सध्या आपला देश हा अनेक कसोट्यामधुन जात आहे आणि सद्य स्थितीत देशाची आर्थिक बाजू बळकट करण्याचे खूप मोठे आव्हान समोर आहे. या करोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या कठीण प्रसंगात प्रत्येकाने आरोग्याबाबत दिलेल्या सुचनांचे कसोशीने पालन करून, निरोगी राहणे खुप महत्वाचे. आपण निरोगी तर आपला देश निरोगी आणि स्वस्थ राहील.
या कार्यक्रमात सजावटीची जवाबदारी सहा. प्राध्यापिका रॅव्हनीशबेक्टर आणि अकाऊंटंट पल्लवी खोत यांनी पार पाडली तर सहा. प्राध्यापिका धनश्री चौगुले यांनी सुरेल आवाजात देशभक्ती गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्राध्यापिका कल्पना पोळ यांनी तर आभार प्रदर्शन सहा. प्राध्यापिकाकु. संघप्रिया शेरे यांनी केले. या वेळी ग्रंथपाल हितेश छतानी, शिक्षकेतर कर्मचारी अनिकेत घरत, संजय दरवडा, प्रमोद कोळी, सचिन पवार, नितीन कोळी, महेश घरत तसेच सीकेटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे अनिल नकटी सर हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment